तुमच्या बायकोसोबत असं काही घडू नये… नवऱ्यांनो, सावध व्हा; ‘ही’ गोष्ट नेहमी लक्षात ठेवा

| Updated on: Apr 11, 2023 | 9:05 AM

जर तुमचं लग्न झालं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण ठरु शकते. थोडासाही निष्काळजीपणा केल्यास तुमच्या घरातही असा प्रसंग घडू शकतो.

तुमच्या बायकोसोबत असं काही घडू नये... नवऱ्यांनो, सावध व्हा; ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा
Image Credit source: freepik
Follow us on

डेहराडून : जर तुमचं लग्न झालं (married people) असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण ठरु शकते. थोडासाही निष्काळजीपणा (do not neglect) केल्यास तुमच्या घरातही पत्नीसोबत असा प्रसंग घडून पश्चातापाची वेळ येऊ शकते. अशा प्रकारच्या घडना रोखण्यासाठी पतीने अतिशय अलर्ट (be alert) राहण्याची गरज आहे. पती-पत्नी दोघांनीही नेहमी सावध, सतर्क राहणे महत्वाचे आहे. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ही घटना उत्तराखंड येथील हरिद्वार जिल्ह्यातील नवोदय नगर रोशनाबाद येथील एका विवाहीत महिलेसोबत घडली आहे. भाड्याची खोली पाहण्यासाठी आलेल्या दोन युवकांनी त्या महिलेल्या तिच्याच घरात कोंडून बंद केले आणि तिचे सोन्या-चांदीचे दागिने लुटून पोबारा केला. आरडाओरडा केला किंवा कोणाला याबाबत सांगितले तर जिवानिशी मारू अशी धमकीही तिला देण्यात आली.

हे दोन भामटे इतके डोकेबाज होते की त्यांनी त्या महिलेला तिच्याच घरात बंद केले अन् ते पसार झाले. या घटनेनंतर महिलेने आरडाओरडा केला असता आजूबाजूच्या लोकांनी कडी उघडून त्या महिलेला खोलीच्या बाहेर काढले. महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात युवकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही दुर्दैवी घटना गेल्या आठवड्यात शुक्रवारी घडली आहे. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी नवोदय नगर चौकात विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज हस्तगत केले आहे.

नवोदय नगर, रोशनाबाद येथे राहणाऱ्या मिस्टर शर्मा यांच्या घरात दोन युवक खोली भाड्याने घेण्यासाठी व त्या संदर्भात बोलणी शुक्रवारी दुपारी करण्यासाठी आले होते. त्यावेळी शर्मा यांची पत्नी घरात एकटी होती. त्या भाड्याने देण्याची खोली दाखवण्यासाठी वळताच दोघांपैकी एका युवकाने त्यांच्या तोडांवर हात ठेवत ते बंद केले. तर दुसऱ्या युवकाने त्यांच्या गळयातील सोन्याची चेन, सोन्याचे कानातले आणि चांदीचे पैंजण खेचून घेतले.

मिसेस शर्मा यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करताच त्या युवकांनी त्यांना जिवानिशी मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्या दोन ठकांनी मिसेस शर्मा यांना त्यांच्याच खोलीत बंद करत दाराला बाहेरून कडी लावली व घटनास्थळावरून पोबारा केला. शर्मा यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला असता, शेजारी राहणाऱ्या लोकांनी दार उघडले व संपूर्ण घटनेचा खुलासा झाला. याप्रकरणी जवळच्याच पोलिस स्थानकात अज्ञात तरूणांविरोधात चोरी व लूटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.