नाशिक : वाहनं फोडून दहशत माजविणाऱ्या तरुणाला नाशिक पोलीसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. ज्या ठिकाणी वाहनं फोडली त्याच ठिकाणी संशयित आरोपीला घेऊन जात धिंड काढून आरोपीची पोलीसांनी जिरवली आहे. नाशिक शहरातील सातपुर कॉलनी परिसरात जवळपास दहा वाहनांची तोडफोड केल्याची घटना समोर आली होती त्यावरून नाशिक शहरातील सातपुर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सातपुर पोलीसांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर आरोपीला अटक करून कठोर कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यावरून सातपूर पोलीसांनी संशयित तरुणाला सिसिटीव्हीच्या माध्यमातून तपास करत अटक करून कारवाई केली आहे. याच वेळी सातपुर परिसरात या तरुणांची पोलीसांनी धिंड काढली आहे. काही तासातच सातपुर पोलीसांनी संशयित आरोपी आकाश जगतापच्या मुसक्या आवळून कारवाई केल्याने पोलीसांच्या कारवाईचे स्वागत केले जात आहे.
सातपुरच्या कॉलनी परिसरात मध्यरात्रीच्या दरम्यान मद्यपान करून फिरत असतांना नशेत वाहनांची तोडफोड केल्याची कबुली संशयित आरोपीने दिली आहे.
संशयित आरोपी आकाश निवृत्ती जगताप हा एमएच बी कॉलनीतील रहिवासी असून सातपुर परिसरातच त्याची नाशिक शहर पोलीसांनी धिंड काढली आहे.
सातपुर परीसरात वाहन तोंडफोडीच्या घटणेने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, पोलीसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात होती, त्यानंतर ही कारवाई पोलीसांनी केल्याने नागरिकांनी टाळ्या वाजवत पोलिसांचे कौतुक केले आहे.
परिसरातील लोकप्रतिनिधी असलेले सलीम शेख यांच्यासह सातपुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम शेख, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ, दीपक खरपडे यांच्या पथकाने ही कारवाई केल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.