पुण्यातील पोर्षे कार हिट अँड रन प्रकरण चर्चेत असताना मुंबईतील वरळीमध्येही अशीच एक घटना घडली आहे. वरळीमध्ये रविवारी पहाटे एका बीएमडब्ल्यू कारने दुचाकीवरील दाम्पत्याला धडक दिली. या धडकेनंतर खाली पडलेल्या महिलेला कारने फरफटत नेलं. या हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शाह अद्याप फरार आहे. तर पोलिसांनी आतार्यंत आरोपी मुलाचे वडील राजेश शाह आणि त्यांचा ड्रायव्हर राजेंद्रसिंग बिडावत यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर आता मिहिर शाहच्या गर्लफ्रेंडलाही चौकशीसाठी बोलावलं आहे.
मुंबईमधील वरळी येथे सकाळ पहाटे 5 वाजता प्रदीप नाखवा आणि कावेरी नाखवा हे मच्छीमार दाम्पत्य गाडीवरून चालले होते. ससून डॉक बंदराकडून ते मासे घेऊन येत होते. या दाम्पत्याला बीएमडब्ल्यू गाडीने जोरदार धडक दिली. धडक दिलेल्या गाडीमध्ये मिहिर शाह आणि त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती होती. धडक दिल्यावर दाम्पत्य खाली पडले, त्यानंतर कावेरी नाखवा यांना बीएमडब्ल्यूने फरफटत नेलं. प्रदीप नाखवा यांनी सांगितल्यानुसार कावेरी यांनी सी लिंक पर्यंक फरफटत नेलं. त्यांच्या अंगावरील कपडेही फाटले होते. उपचारादरम्यान कावेरी यांचा मृत्यू झाला. वरळीच्या कोळीवाड्यात नाखवा मच्छीमार दाम्पत्य राहत होते.
मिहिर शाह हा कार चालवत होता. अपघातानंतर मिहीर घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी चालक ड्रायवर राजेंद्र सिंग बिडावत यांना ताब्यात घेतलं आहे चौकशी सुरु आहे आणि वडील राजेश शाह यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. नियमानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास सुरु आता दोन गाडीत होते. मिहिर शहा आणि राजेंद्रसिंग बिडावत हे दोघे गाडीत होते त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती डीसीपी कृष्णकांत उपाध्याय यांनी दिली.
दरम्यान, मिहिर शाह याच्या गाडीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मिहिर शाह चार मित्रांसह मर्सिडीज कारमधून उतरताना आणि कारमध्ये बसताना दिसत आहे. हे सीसीटीव्ही फुटेज जुहू व्हॉईस ग्लोबल तपस बारच्या बाहेरचे आहे. त्यामुळे आरोपी दारूच्या नशेत गाडी चालवत होता का? याचा तपास पोलीस करत आहेत.