मुंबई : दोन मुलांच्या ग्रुपमधील (Group rada) राडा तुम्ही पाहिला असेल ? परंतु दोन मुलींमधील भररस्त्यातला असा राडा कधी पाहिला आहे का ? दोन मुलींमधील राड्याचा व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर (Social media)अधिक व्हायरल झाला. चार मुली एका मुलीला मारत आहेत, विशेष म्हणजे एका मुलीने दांडक्याने मारामारी केल्याचं व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे.
हा व्हिडीओ उत्तराखंड राज्यातील हरिद्वार जिल्ह्यातील रुडकी शहरातील आहे. काही कारणामुळे मुलींमध्ये वादावादी झाली, त्यामुळे चार मुलींनी एका मुलीला जोरदार मारहाण केली. त्याचबरोबर एकमेकींची केसं देखील खेचली असल्याचं पाहायला मिळालं.
झालेल्या भांडणाचा व्हिडीओ कोणतीही सोशल मीडियावर अपलोड केला आहे. तो व्हिडीओ आता इतका व्हायरल झाला आहे, की सगळ्यांना एक एकप्रकारे धक्का बसला आहे.
लड़कियों के बीच डंडों के साथ जमकर हुई मारपीट, वायरल वीडियो रुड़की का बताया जा रहा है।@haridwarpolice pic.twitter.com/xraOyDQQRb
— Vijay Pundir (@vip_pundir) December 25, 2022
तिथल्या पोलिसांनी सांगितले की, व्हायरल झालेल्या व्हिडीओतील कोणत्याही व्यक्तीने अद्याप तक्रार दाखल केलेली नाही. त्यामुळे आम्ही कोणावरही कारवाई केलेली नाही. त्याचबरोबर तक्रार आल्याशिवाय कोणतीही कारवाई करणार नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.