उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh Crime News) राज्यातील कन्नोजमध्ये एक संतापजनक घटना समोर आलीय. गंभीर जखमांमुळे तडफडत असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा (Minor Girl Viral Video) अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये मुलगी मदतीची भीक मागत होती. पण समोर असलेले निर्दयी लोक या मुलीचा व्हिडीओ काढण्यात दंग होते. या संतापजनक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात (Social Media) व्हायरल झालाय. दरम्यान, या संपूर्ण प्रकाराचा अंगावर शहारे आणणारा थरारक घटनाक्रमही समोर आला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये एका अल्पवयीन मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत शेतातील सुकलेल्या गवतात पडली आहे. तिच्यासमोर काही लोक उभे असलेले दिसून आलेत. ही मुलगी मदतीसाठी समोर उभ्या असलेल्या लोकांकडे कळकळीची विनंती करतेय. उभं राहण्यासाठी ती आपला हात पुढे करत असते. पण कुणीच मदतीसाठी पुढे येत नाही.
मदत करणं तर दूरच, पण समोर असलेले लोक या मुलीचा मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात दंग असल्याचं दिसलेत. या मुलीच्या हातातून रक्त येत होतं. तिला उभंही राहता येत नव्हतं.
जखमी अवस्थेत असलेल्या या मुलीचं वय 12 ते 13 वर्षांच्या दरम्यान, असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, याबाबत कळल्यानंतर एक पोलिसवाला येतो. तो मुलाला आपल्या हातांनी उचलतो आणि तसाच थेट रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतो.
पीडितेला हातात घेऊन रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या या पोलिसाचं कौतुक आहेच, पण तिला मरणासाठी सोडून दिलेल्यांना आणि तिचा व्हिडीओ काढत बसलेल्यांचं काय करायचं? उत्तर प्रदेशची संतापजनक घटना #UttarPradesh pic.twitter.com/opoxr5111l
— Siddhesh Sawant (@ssidsawant) October 25, 2022
हा संतापजनक व्हिडीओ समोर आल्यानंतर या मुलीचं अपहरण करुन तिचा बलात्कार झाला असावा, अशी शंका व्यक्त केली जाते आहे. मुलीची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. तिच्यावर रुग्णालयाच उपचार सुरु आहे. 15 तासांपासून या मुलीची मृत्यूशी झुंज सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
Sources says this video is from Kannauj, Uttar Pradesh. A girl was raising her hands for help, but people keep taking photo and videos, no body dares to show some humanity and morality they keep shooting videos, This is the society we are living in.#Betibachao pic.twitter.com/GqzMS3kKMN
— Noor Mahvish (@TheNoorMahvish) October 24, 2022
अत्यंत नाजूक अवस्थेत असलेल्या मुलीला बोलताही येत नसल्याची माहिती समोर आली आहे. तिच्या प्रकृतीतही कोणतीही सुधारणा झालेली नाही. पोलिसांकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तिच्यासोबत गैरप्रकार झालेला असण्याची दाट भीती व्यक्त केली आहे. पीडित मुलगी गंभीर जखमी अवस्थेत एका डाक बंगल्याच्या मागच्या बाजूला आढळून आली असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
डाक बंगल्याच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेजचीही आता पाहणी पोलीस कऱणार आहेत. प्राथमिक माहितीनुसार. एका तरुणासोबत ही अल्पवयीन मुलगी बोलत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालंय.
सध्या याप्रकरणाचा छडा लावण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. पण कुणीच या मुलीच्या मदतीला धावून न आल्यानं अधिक संताप व्यक्त केला जातो आहे. मोबाईल हातात आल्यापासून लोकांच्या संवेदना बोथट झाल्यात का, असा सवाल या घटनेमुळे उपस्थित केला जातोय.
उपस्थित लोकांनी वेळीच जर या मुलीला रुग्णालयात पोहोचवलं असतं, तर कदाचित तिला लवकरच उपचार मिळू शकले असते, असंही मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.