सोलापूर : बार्शीचा शेअर मार्केट घोटाळा (Barshi share market scam) सध्या चांगलाच गाजत आहे. विशाल फटे (Vishal Phate) हे नाव अचानक संपूर्ण महाराष्ट्रला माहीत झालं आहे, कारण या फटेवर कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला आज न्यायलयाच हजर करण्याच आले होते, बार्शी न्यायालयाने विशाल फटेला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे फटेच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. याआधीच पोलिसांनी या प्रकरणात आणखी काही आरोपींनाही अटक केली आहे. अटके केलेल्यामध्ये विशाल फटेच्या भावाचा आणि त्याच्या वडिलांचाही समावेश आहे. सोशल मीडियावर तर लोक या विशाल फटेला दुसरा हर्षद मेहता असे नाव देत आहेत, कारण बार्शीतल्या गैरव्यवहाराचे हे प्रकरण सध्या राज्यभर चर्चेत आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
कोर्टाने आज बार्शी येथील विशाल फटे याला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत मुक्कामी पाठवले आहे . विशाल फटे याने अनेक लोकांची करोडोंची फसवणूक केल्याची तक्रार आहे. फटेने तब्बल 81 गुंतवणूकदारांची 18 कोटी 75 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार आहे. फटे याच्यासह 4 जाणांवर गुन्हा करण्यात आला आहे. फटे याचे वडील अंबादास फटे आणि भाऊ वैभव फटे याला 16 जानेवारील अटक केली असून 20 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विशाल फटे हा लोकांना अमिश दाखवून पैसे लुटायचा त्याने हे पैसे कोणाकडून घेतले आणि कुठे गुंतविले याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
विशाल फटे पोलिसांना शरण
गेल्या काही दिवसांपासून बार्शी पोलीस विशाल फटेच्या मागावर होते, मात्र विशाल फटेला याची चाहूल लागताच तो फरार झाला होता. त्यानंतर त्याने एक व्हिडिओही प्रसिद्ध केला होता. शेवटी विशाल फटे हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे, तो तपासात पोलिसांना सहकार्य करीत आहे. विशाल फटे याने ठेवीदार यांची मुदतपूर्व रक्कम वापस न दिल्याची तक्रार नाही. लोकांची फसवणूक झाली नाही . विशाल फटे हा लोकांना मिळून येत नाही या स्वरूपाच्या तक्रारी आहेत. अशी बाजू फटेचे वकील विशाल बाबर यांनी कोर्टात मांडली आहे.