‘ती’ डायरी वाचताच पोलीसही अवाक, तरुणाच्या डायरी लिहिण्याच्या सवयीतून प्रेयसीच्या खुनाचा लागला छडा

| Updated on: May 04, 2022 | 9:40 PM

तिच्याशी दररोज होणारे संभाषण आणि त्याच्या मनातील विचार हा आरोपी नियमित डाय़रीत लिहून ठेवीत असे. ही डायरी हाती लागल्याने या खुनामागचा मुख्य उद्देश पोलिसांच्या लक्षात आला. आता ही डायरी हस्ताक्षर तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे.

ती डायरी वाचताच पोलीसही अवाक, तरुणाच्या डायरी लिहिण्याच्या सवयीतून प्रेयसीच्या खुनाचा लागला छडा
वर्ध्यात प्रेयसीची हत्या करणाऱ्याला अटक
Image Credit source: TV9
Follow us on

वर्धा : एका डायरीतून वर्धा पोलिसांनी (Wardha Police) एका अल्पवयीन तरुणीच्या खुनाचा छडा लावला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी हा या मृत अल्पवयीन तरुणीचा प्रियकर होता. मात्र या मुलीचे दुसऱ्या तरुणाशी प्रेमप्रकरण असल्याचा संशय त्याला आल्याने, त्याने या अल्पवयीन तरुणीची हत्या (Murder) केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. तिच्याशी दररोज होणारे संभाषण आणि त्याच्या मनातील विचार हा आरोपी नियमित डाय़रीत (Diary) लिहून ठेवीत असे. ही डायरी हाती लागल्याने या खुनामागचा मुख्य उद्देश पोलिसांच्या लक्षात आला. आता ही डायरी हस्ताक्षर तपासणीसाठी पाठवण्यात आली असली, तरी या डायरीमुळेच या आरोपीला आता शिक्षा होणार आहे. डायरी लिहिण्याची सवय तशी चांगली असल्याचे मानले जाते. या प्रकरणात मात्र या डायरीमुळे आरोपीच्या विरोधात ठोस पुरावाच पोलिसांच्या हाती लागला.

नेमकं काय घडलं?

काही दिवसांपूर्वी वर्धा जिल्ह्यात पवनार नुदीच्या काठी एका अल्पवयीन मुलीचे कपडे पोलिसांना मिळाले होते. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि २४ तासांत त्यांनी एका संशयिताला या प्रकरणी अटक केली. संशयीत सतीश जोगेच्या तपासात त्याची दैनंदिन डायरीही पोलिसांच्या हाती लागली. आणि या डायरीतून या सगळ्या खुनाचा खटला पोलिसांना उलगडला. आरोपी सतीश जोगे याने विवस्त्र करुन या मुलीची ओढणीने गळा आवळून हत्या केल्याचे तपासात समोर आले, इतकेच नाही तर त्याने या मुलीचा

मृतदेह पुरुन ठेवल्याचेही समोर आले

या अल्पवयीन तरुणीशी आरोपी सतीश याचे प्रेमसंबंध होते. तिच्याकडे मोबाईल नव्हता. पवनार येथील नंदीघाट परिसरात फिरण्यास आलेल्या एका तरुण आणि तरुणीला धमकावून सतीशने त्यांचे मोबाईल जबरीने हिसकावून घेतले होता. त्यातील एक मोबाईल त्याने प्रेयसीला दिला होता. दरम्यानच्या काळात ही अल्पवयीन तरुणी देवणीला गेल्यानंतर तिथे तिची एका दुसऱ्या तरुणाशी ओळख झाली. तिचे त्या तरुणाशीही प्रेमसंबंध होते, असा संशय सतीशला होता. प्रेयसी मुलगी आणि तिचा दुसरा प्रियकर मिळून , सतीशला तुरुंगात टाकणार असल्याचा संशय त्याला आला. मोबाईल चोरीची तक्रार पोलिसांत जाईल या भीतीपोटी त्याने या मुलीच्या हत्येचा कट रचला, अशी माहिती सेवाग्रामचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

डायरी वाचून पोलीसही हादरले

सतीशला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून तो दिनचर्चा लिहित असलेली डायरीही पोलिसांच्या हाती लागली. या डायरीतला मजकर पाहून पोलीसही चक्रावले. यात या नराधमाच्या क्रूरतेचे अनेक किस्से समोर आले. आरोपी सतीशने मुलीला कसे मारले, कोणत्या कारणामुळे मारले, तसेच तिच्याशी केव्हा आणि कुठे शारिरिक संबंध ठेवले, एवढेच नव्हे तर दिवसभर त्याच्यासोबत काय काय घडले, याची सर्व तपशीलवार नोंद या डायरीत पोलिासंना सापडली. आरोपी सतीशला दररोजची दिनचर्या लिहिण्याची सवय होती. सध्या ही डायरी पोलिसांच्या ताब्यात आहे. आता ही डायरी पोलीस हस्ताक्षर तज्ज्ञांकडे तपासणीसाठी पाठविणार आहेत.

आरोपी सतीशवर यापूर्वीही गुन्हा दाखल

आरोपी सतीश याच्याविरुद्ध यापूर्वीही सिंदी रेल्वे पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणात सतीशला सहा ते सात महिने कारागृहाची हवा देखील खावी लागली होती. मात्र, त्यानंतरही त्याने असे प्रकार सुरुच ठेवले. पवनार येथील प्रकरणात आरोपीने स्वतःच्या हातानेच डायरीत मजकूर लिहल्याने पोलिसांच्या हाती मोठा पुरावा लागला आहे.