वर्धा – मालवाहू वाहनातून दोन प्लास्टिक ड्रममध्ये डिझेल घेऊन सेवाग्रामकडे जात असलेल्या चालकाला कालमधील इमसांनी लुटले आहे. ही घटना दत्तपूर (Dattapur) ते सेवाग्रामकडे (Sevagram) जाणाऱ्या मार्गावर असलेल्या म्हसाळानजीकच्या हायवेवर घडली आहे. मागून भरधाव वेगाने आलेल्या कारमधील तरूणांनी चाकूचा धाक दाखविला. त्यानंतर जंगलात नेलं. साधारण तीन लाखांचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार पोलिसांकडे (Wardha Police) दाखल झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी करणार असल्याचं जाहीर केलं आहे.
नेमकं काय घडलं
सुनील सुखदेव पाटील हा प्रतीक दप्तरी यांच्याकडील मालवाहू वाहनावर चालक म्हणून नोकरी करतो. तो मालवाहू घेऊन केळझर येथे गेला. केळझर येथील पेट्रोल पंपावरून दोन ड्रममध्ये 41 हजार 200 रुपयांचे 400 लिटर डिझेल आणि 1220 रुपये किमतीचे 10 लिटर पेट्रोल डबकीत भरून मालवाहू वाहनात टाकून नवीन म्हसाळा मार्गाने एमआयडीसी सेवाग्रामकडे जात होते.त्यावेळी मागून भरधाव चारचाकी वाहन आले. त्यांनी कार मालवाहूच्या वाहनाच्या आडवी लावली. कारमधून चार अज्ञात व्यक्ती उतरून त्यातील एकजण मालवाहू जवळ आला. वाहनाची चावी काढून चालकाला वाहनाबाहेर उतरल्यानंतर चाकूचा धाक दाखवून बळजबरीने त्यांच्या कारमध्ये बसवले. एका व्यक्तीने मालवाहू वाहन घेतले. ते वाहन विरूद्ध मार्गाने सेलू ते कान्होलीबारा मार्गावर नेले. त्यानंतर मालवाहू गाडी चालकाला कार जंगलात चौघेजण घेऊन गेले. त्याच्याकडे असलेल्या सगळ्या वस्तू अज्ञात व्यक्तींनी काढू घेतले. त्यानंतर चोरटे कान्होलीबारा गावाकडे पळून गेले असल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली आहे.
पोलिसांची आठ पथके रवाना
लूटमार करणाऱ्या आरोपींच्या शोधात सेवाग्राम पोलीसांनी चार पथके तयार केली आहेत. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे चार अशी एकूण आठ पथके रवाना झाली आहेत. त्यामुळे लवकरच आरोपी पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे.
आरोपी सापडल्यानंतर आणखी गुन्ह्याचा खुलासा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.