वाशिम : वाशिम (washim) जिल्ह्यातील मालेगाव (malegaon) तालुक्यातल्या बोराळा (borala) येथील उपसरपंच यांचा गावातीलच काही लोकांनी अपहरण करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 18 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान काही अज्ञात इसमांनी विश्वास कांबळे यांचं अपहरण केलं होतं. त्यानंतर मालेगाव तालुक्यातीलच गुंज या ठिकाणी ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. नंतर त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं, तेव्हा त्यांना मृत घोषित करण्यात आले. उपसरपंच यांच्या पत्नीने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे गावातील अजून काहीजण अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्ती केली आहे.
विश्वास कांबळे असं उपसरपंचांचं नाव आहे. गावातील काही लोकांना त्यांना काही काम असल्याचं सांगून घरातून बाहेर काढलं. त्यानंतर त्यांचं उपहरण केलं. त्यांचा गावातील लोकांनी कुटुंबियांनी शोध घेतला. परंतु ते काही परिसरात आढळून आले नाही. त्यानंतर मालेगाव तालुक्यातीलच गुंज या ठिकाणी ते बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली.
गावातील लोकांनी आणि त्यांच्या पत्नीने घटनास्थळी धाव घेतली. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु उपचारापुर्वी त्यांचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. या प्रकरणी पोलिसांनी चार लोकांना अटक केली आहे. त्याचबरोबर अजून काही लोकांना अटक होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात ॲट्रॉसिटीसह, अपहरण आणि खुणाचा गुन्हा दाखल केला आहे. विश्वास कांबळे हे कांबळे हे बोराळा गावचे उपसरपंच असून राजकीय वादातून त्यांची हत्या झाल्या असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला असून वैद्यकीय अहवाल आल्यानंतर नेमका त्यांचा मृत्यू कशामुळे हे उजेडात येणार आहे.