वाशिम : अल्पवयीन मुलाला छर्र्याच्या बंदुकीतून गोळी मारल्या प्रकारणी रिसोड पोलिसात (Washim Minor Boy Injured ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुलगा जखमी झाला आहे, त्याच्यावर उपचार सुरु आहेत. वाशिम जिल्ह्यातील चाकोली येथे ही घटना घडली (Washim Minor Boy Injured ).
वाशिमच्या रिसोड तालुक्यातील चाकोली येथील पोलीस पाटील गोविंद गरकळ यांनी शेतातील माकडं हकालण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या छर्र्याच्या बंदुकीचा वापर करत गावातील एका अल्पवयीन मुलाला जखमी केल्याची घटना घडली. या घटनात गावात राहणारा अल्पवयीन मुलगा जखमी झाला.
सोमवारी (8 फेब्रुवारी) सायंकाळी ही घटना घडली. यामध्ये अल्पवयीन मुलाच्या हातावर छर्र्या लागून जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गावातील अल्पवयीन मुलगा दुकानामध्ये चहाची पुडी आणण्यासाठी गेला होता. तेव्हा गावातील पोलीस पाटील घरासमोर बंदूक घेऊन उभे होते. अल्पवयीन मुल जवळ येताच पोलीस पाटलाने त्याच्या दिशेने बंदूक रोखून त्याच्यावर वार केला, अशा प्रकारची तक्रार जखमी अल्पवयीन मुलाचे काका दिलीप रामराव गरकळ यांनी दिली आहे. दरम्यान, पोलीस पाटील गोविंद गरकळ यांच्याविरोधात रिसोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून गोळीबार का केला याचा पुढील तपास रिसोड पोलीस करीत आहेत.
दुचाकीवरुन दोनजण आले, गोल्डमॅनवर दिवसाढवळ्या भर चौकात गोळीबार, आरोपी फरार, वाचा थरारhttps://t.co/egTcg7j8tz#Pune #PuneCrime #Crime #PuneCrimeNews #CrimeNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 9, 2021
Washim Minor Boy Injured After Shot By Chharra Pistol
संबंधित बातम्या :
धुळ्यात एकाच रात्रीत पाच ठिकाणी चोरीचा प्रयत्न, नगरसेवकाच्या घरी चोरीचा डाव फसला
भिवंडीत आदिवासी वस्तीचे पाणी बंद करणाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
प्लास्टिकच्या बॅगमध्ये महिलेचा अर्धवट मृतदेह, अॅसिड टाकून जाळण्याचाही प्रयत्न, कोल्हापुरात खळबळ
मैत्रिणीसोबत जवळीक वाढवल्याचा राग, नाशिकच्या मित्राकडून नवी मुंबईत तरुणाची हत्या