पेटत्या चितेसमोर तृतीयपंथीनी अघोरी पूजा करण्यामागील कारण आले समोर, कारण ऐकून तुम्हाला धक्काच बसेल

| Updated on: Dec 26, 2022 | 9:35 AM

पुणे शहरातील वैकुंठ स्मशानभूमी येथे पेटत्या चितेसमोर अघोरी पूजा करत असतांना दोन तृतीयपंथीयांना पुणे पोलीसांनी रंगेहाथ पकडले होते.

पेटत्या चितेसमोर तृतीयपंथीनी अघोरी पूजा करण्यामागील कारण आले समोर, कारण ऐकून तुम्हाला धक्काच बसेल
Image Credit source: Google
Follow us on

पुणे : पुणे शहरातील वैकुंठ स्मशानभूमीत दोन तृतीयपंथीयांनी पेटत्या चितेसमोर जादूटोणा केल्याचा प्रकार समोर आला होता. वैकुंठ स्मशानभूमीतील कर्मचाऱ्याने रात्रीच्या दरम्यान ही घटना पहिल्याने त्याने विश्रामबाग पोलिसांना ही माहिती कळवली होती. त्यावरून पोलीसांनी दोन्ही तृतीयपंथीयांना रंगेहाथ पकडले होते. या घटनेवरुन संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. पुणे पोलीसांनी या प्रकरणी जादूटोणा विरोधी कायद्यानंतर्गत गुन्हा दाखल केला होता. लक्ष्मी निबाजी शिंदे आणि मनोज अशोक धुमाळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे होती. हे दोन्हीही तृतीयपंथी असल्याचे समोर आले होते. पुणे पोलीसांच्या तपासात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आईला झालेला कॅन्सर बरा व्हावा म्हणून चितेजवळ जादूटोण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पेटत्या चितेसमोर अघोरी पुजा केल्याने कॅन्सर दुसऱ्याच्या शरीरात जातो असा समज करून घेतल्याने अघोरी पूजा करत असल्याची कबुली दोघा तृतीयपंथीयांनी दिली आहे.

पुणे शहरातील वैकुंठ स्मशानभूमी येथे पेटत्या चितेसमोर अघोरी पूजा करत असतांना दोन तृतीयपंथीयांना पुणे पोलीसांनी रंगेहाथ पकडले होते.

स्मशानभूमीत एका पेटत्या चितेसमोर दोघा तृतीयपंथीयांनी अघोरी पूजा मांडली होती, यातील एकाच्या आईला कॅन्सर झाल्याने ही अघोरी पूजा करण्याचा प्रयत्न सुरू होता.

हे सुद्धा वाचा

प्रेत जळत असतांना अघोरी पूजा केली तर आईंच्या अंगातून कॅन्सर निघून जातो असा समज या तृतीयपंथीयांचा होता, या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती.

लक्ष्मी निबाजी शिंदे आणि मनोज अशोक धुमाळ अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे असून तपासात धक्कादायक बाबींचा खुलासा करण्यात आला आहे.

पुण्यातून ही घटना समोर आल्याने संपूर्ण पुणे शहरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून अंधश्रद्धेला आजही बळी पडणाऱ्यांची संख्या दिसून येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.