नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सुरगणा तहसील कार्यालयात बुधवारी एक मोठा राडा झाल्याचे समोर आले आहे. नायब तहसीलदार यांच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर महसूल विभागात खळबळ उडाली असून कारवाईची मागणी केली जात आहे. संबंधित नायब तहसीलदाराने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती. त्यावरून गुन्हा देखील झाला आहे. सातबाऱ्यावर माझं नाव का नाही आलं? अशी विचारणा करणाऱ्या भारत गुलाब पवार यांनी सुरगाणा नायब तहसीलदार राजेंद्र मोरे यांच्या कॉलर पकडून कानशिलात लागावली आहे. हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर तहसील कार्यालयात एकच गोंधळ निर्माण झाला होता. पवार यांच्या सोबत आणखी दोघे जण उपस्थित होते. नायब तहसीलदार यांच्या गालात चापट मारल्यानंतर तहसील कार्यालयाच्या बाहेर तिघांनी ठाणही मांडले होते. मात्र, आपल्यावर कारवाई होईल असे लक्षात येताच तेथून त्यांनी पळ काढला आहे.
आपली मालकी आहे हे सिद्ध करण्यासाठी जमिनीचा सातबारा हा महत्वाचा मानला जातो. त्याच संदर्भात विचारणा करणाऱ्या विषयावरून राडा झाला आहे.
सुरगाणा तालुक्यातील हट्टी येथील संशयित भारत पवार याने वडिलांच्या नावानंतर माझे नाव का लावले नाही, इतरांचे सर्वांचे नाव लावले माझ का नाही ? अशी विचारणा केली.
त्यावेळी तहसील दार यांनी तुम्ही लेखी अर्ज करून द्या मग ते नावं लागेल असे सांगितल्या, त्यावेळी पवार यांनी इतरांचे नाव लावले माझे का ठेवले म्हणून नायब तहसीलदार मोर यांची कॉलर पकडली.
नायब तहसीलदार मोरे यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यावेळी संतप्त झालेल्या शेतकरी भारत मोरे याने थेट नायब तहसीलदार यांच्या कानशिलात लागावली.
हा वाद आता सुरगाणा पोलीस ठाण्यात जाऊन पोहचला आहे. नायब तहसीलदार यांनी फिर्याद दिली त्यावरून पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास सुरू केला आहे.