नांदेड: व्यसनाधीन झालेल्या पित्याला कंटाळलेल्या मुलाने आपल्या आईच्या मदतीने सुपारी देऊन पित्याचा खून (Murder) केल्याची घटना तब्बल दीड वर्षानंतर उघडकीस आली आहे. 14 ऑगस्ट 2019 रोजी नांदेड शहरातील सरपंच नगर भागात शरद कुऱ्हाडे नावाच्या इसमाचा मृतदेह त्याच्या राहत्या घरात सापडला होता. पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात कुऱ्हाडे यांनी आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली होती. (Murder mystery revealed in Nanded)
शवविच्छेदनानंतर अधिक तपासणीसाठी अहवाल प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता. दरम्यानच्या काळात या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सखोल तपास करण्याचे आदेश दिले. शवविच्छेदन अहवालात कुऱ्हाडे यांच्या शरीरावर तीक्ष्ण हत्यारांचे 14 वार होते.
यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी संशयितांना ताब्यात घेऊन पुन्हा चौकशीला सुरुवात केली. संशयितांची कसून चौकशी केल्यानंतर शरद कुऱ्हाडे यांच्या आत्महत्येचा बनाव उघड झाला.
शरद कु-हाडे दारूच्या आहारी गेले होते. नशेत असताना ते पत्नी आणि मुलाला मारहाण करायचे. दारुसाठी पैस मिळवण्यासाठी त्यांनी घरही विकण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पत्नी अश्विनी कु-र्हाडे आणि त्यांच्या अल्पवयीन मुलाने हत्येसाठी 1 लाख रुपयांची सुपारी दिली.
हत्येची सुपारी घेणारी मुलेही खून झालेल्या व्यक्तीच्या मुलाचे अल्पवयीन मित्र निघाले. पोलिसांनी पत्नी अश्विनी कुऱ्हाडे, सध्या 18 वर्ष वय असलेल्या तीन अल्पवयीन मुलांसह एकूण सहाजणांना अटक केली आहे.
संबंधित बातम्या :
आईचा लग्नाला नकार, सोलापुरात तरुणाकडून आत्तेबहिणीचा गळा आवळून खून
चार दिवस दारु पाजून आदिवासी महिलेची गँगरेप करुन हत्या, पोलिसांनी शिताफीने आरोपींना पकडलं
परळीची तरुणी, पुण्यात आत्महत्या, विदर्भातल्या मंत्र्याचं कनेक्शन? चौकशीसाठी भाजप आक्रमक
(Murder mystery revealed in Nanded)