Mumbai Crime : घटस्फोटाचा फक्त उच्चार केला अन् त्याने चेहर्‍यावर थेट ॲसिडच फेकलं…

| Updated on: Sep 27, 2024 | 11:06 AM

मुंबईतील गुन्हेगारीच्या घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून सामान्य नागरिकांना जीव मुठीत धरून जगायला लागत आहे. त्यातच आता शहरातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Mumbai Crime : घटस्फोटाचा फक्त उच्चार केला अन् त्याने चेहर्‍यावर थेट ॲसिडच फेकलं...
नागपूरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या
Follow us on

मुंबईतील गुन्हेगारीच्या घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून सामान्य नागरिकांना जीव मुठीत धरून जगायला लागत आहे. त्यातच आता शहरातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मालवणी येथे एका महिलेच्या पतीने तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकल्याची भयानक घटना घडली आहे. या हल्ल्यात पीडित महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारांसाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यामुळे प्रचंडखळबळ माजली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला अवघी 27 वर्षाची असून ती मालवणी येथे राहते. 2019 मध्ये तिचा प्रेमविवाह झाला. मात्र तिचा पती सध्या बेरोजगार असू त्याला अमली पदार्थ सेवन करण्याचे व्यसन आहे. एवढंच नव्हे तर त्या इसमाचे एका तृतीयपंथियाशी प्रेमसंबंध आहेत, असे त्या महिलेला समजले होते. या सगळ्या मुद्यावरून त्यांच्यात नेहमीत भांडण व्हायचं. अखेर त्या महिलेने पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तिने पतीकडे थेट घटस्फोटाची मागणी केली.

मात्र ते ऐकताच तिचा पती प्रचंड भडकला. आणि त्याने रागाच्या भरात त्याच्या पत्नीच्या चेहऱ्यावर थेट ॲसिड फेकली. यामध्ये ती महिला गंभीररित्या जखमी झाली आहे. तिच्या आीला हा प्रकार कळताच तिने ताबडतोब मुलीच्या मदतीसाठी तिच्या घरी धाव घेतली. तिच्या आईने तिला कूपर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. आता त्या महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. याप्रकरणी पीडित महिलेने तिच्या पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्याआधारे पोलिसांनी तिच्या पती विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 124(2), 311, 333 आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत