उत्तर प्रदेश : पत्नीने आपल्या शब्दाबाहेर जाऊ नये ही मानसिकता अजूनही कित्येक घरांमध्ये कायम आहे. या मानसिकतेमुळे अनेक महिलांचा हकनाक बळी गेल्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत. उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये अशीच धक्कादायक घटना घडली आणि पती (Husband)ला न सांगता घराबाहेर पडलेल्या महिलेला जीव गमवावा लागला. बाहेरून माघारी परतलेल्या पत्नीला संतापलेल्या पतीने लोखंडी रॉडने बेदम मारहाण (Beating) केली. या मारहाणीत पत्नीचा जागीच मृत्यू (Death) झाला. केवळ पतीला न सांगता घराबाहेर पडणे पत्नीच्या जीवावर बेतले.
पाच दिवसांपूर्वी महिला पतीला न सांगता घरातून निघून गेली होती. त्यानंतर पतीने व त्याच्या कुटुंबीयांनी खूप शोधाशोध केली होती. मात्र तिचा कुठेही थांगपत्ता लागला नव्हता. अखेर पाचव्या दिवशी महिला स्वतःहून घरी परतली होती. ती न सांगता घरातून निघून गेल्याने तिचा पती चांगलाच संतापला होता. यातूनच त्याने महिलेची लोखंडी रॉडने हत्या केली.
हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. घटनेनंतर आरोपी पतीने घरातून पळ काढला आहे. बहजोई कोतवाली भागातील चितौरा गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.
चिटौरा गावात राहणारा आरोपी उस्मान हा कामधंद्यानिमित्त दुसऱ्या राज्यात स्थायिक झाला होता. यादरम्यान त्याची पत्नी दोन मुलांसह मूळ गावात राहत होती. यादरम्यान पत्नी पती उस्मानला न सांगता कुठेतरी निघून गेली होती.
ती पाच दिवसांनी माघारी परतली, तेव्हा उस्मानने तिला जाब विचारला. त्यावर तिने कुठलेही उत्तर दिले नाही. त्यामुळे उस्मानचा पारा आणखीन चढला आणि त्याने मागचा-पुढचा विचार न करता पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला. त्यामुळे प्रचंड रक्तस्राव होऊन पत्नीचा जागीच मृत्यू झाला.
लोखंडी रॉडने केलेल्या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू होताच आरोपी उस्मान चांगलाच हादरला आणि त्याने पत्नीचा मृतदेह घराच्या अंगणात आणून ठेवला आणि स्वतःच्या बचावासाठी तेथून पळ काढला. या घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच त्यांनी पोलिसांनी कळवले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी पाठवला.
पत्नी घराबाहेर न सांगता निघून गेल्यामुळे दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. त्यातूनच मारहाणीत महिलेचा मृत्यू झाल्याचे गावकऱ्यांनी पोलिसांना सांगितले. (Wife beaten to death by husband with iron rod in Uttar Pradesh)