नवी दिल्ली : घरात बायको असतान बाहेर दुसऱ्याच बाईशी विवाह बाह्य संबध( extramarital affair) ठेवणे एका व्यक्तीच्या चांगलेच अंगाशी आले आहे. या लफडेबाज नवऱ्याचं लफडं त्याच्या बायकोनेच पकडलं आहे. या बाईने तिच्या नवऱ्याला दुसऱ्या बाईसह रेड हँड पकडले. यानंतर या महिलेने रौद्र रुप धारण केले आणि हॉटेलमध्येच नवऱ्याची धुलाई केली.
पतीची धुलाई करणारी ही महिला उत्तर प्रदेशात राहणारी आहे. नवऱ्याचे दुसऱ्या बाईसह संबध असल्याची कुणकुण या महिलेला लागली होती.
नवऱ्याच्या कृत्याचा छडा लावण्याचा निर्णय या महिलेने घेतला. मग तिने नवऱ्याचा पाठलाग सुरु केला. नवऱ्याचा पाठलाग करत करत ही महिला थेट उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका हॉटेलमध्ये पोहचली.
हॉटेलमधील एका खोलीत या महिलेचा नवरा थांबला होता. महिलेने डायरेक्ट या रुमवर धडक दिली आणि नवऱ्याला दुसऱ्या बाईसह रोमान्स करताना रंगेहात पकडले.
नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहून महिलेच्या रागाचा पारा चढला. संतापाच्या भरात या महिलेना पायातील चप्पल काढली आणि नवऱ्याला चोप दिला. यावेळी नवऱ्यासह असलेल्या महिलेवर देखील तिने हात उचलला.
बराच वेळ हॉटेलमध्ये हा हंगामा सुरु होता. हॉटेलच्या स्टाफने मध्यस्थी करत हा सर्व गोंधळ थांबवला आणि यांच्यातील वाद शांत केला.
पतीचे विवाहबाह्य संबध असल्याचे या महिलेला माहित होते. यावरुन दोघांमध्ये नेहमी वाद होत असतं. अखेरीस महिलेने पतीला रेड हँड पकडून त्याला चांगलाच धडा शिकवला.