UP: हात-पाय बांधून पत्नीला दिला शॉक, आईच्या शंकेमुळे प्रकरण उजेडात आलं, मग…

| Updated on: Dec 26, 2022 | 12:41 PM

संतापलेल्या पतीचा पत्नीला विद्युत प्रवाहाचा शॉक, कोणालाही शंका येऊ नये म्हणून...

UP: हात-पाय बांधून पत्नीला दिला शॉक, आईच्या शंकेमुळे प्रकरण उजेडात आलं, मग...
UP: हात-पाय बांधून पत्नीला दिला शॉक, आईच्या शंकेमुळे प्रकरण उजेडात आलं, मग...
Image Credit source: twitter
Follow us on

उत्तर प्रदेश : युपीत (UP) क्राईच्या (crime news) रोज नव्या घटना समोर येत असतात. प्रत्येक क्राईमच्या घटनेत एक वेगळं कारण उजेडात येत असतं. पत्नीला मारण्यासाठी एकाने चक्क विद्युत शॉक (electric shock) दिल्याचं प्रकरण पोलिसांनी उजेडात आणलं आहे. विशेष म्हणजे पत्नीला मारल्यानंतर पती दोन दिवस त्याच रुममध्ये झोपला होता.

युपीच्या लखीमपूरमधील ही घटना आहे. आरोपीने पत्नीला धर्म बदलायला लावून लग्न केले होते. दोघांमध्ये सतत भांडण होत असल्यामुळे पतीने तिला संपवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने पत्नीचे रात्री पाय आणि हात बांधले, त्यानंतर तो सतत तीला शॉक देत राहिला.

विशेष म्हणजे ज्यावेळी पत्नीचा मृत्यू झाल्याचं लक्षात आलं. त्यावेळी त्याने राहत्या घरात पत्नीचा मृतदेह पुरला. त्यानंतर पती तिथचं दोन दिवस झोपून राहिला. आता हे प्रकरण उजेडात आलं आहे.

हे सुद्धा वाचा

ज्यावेळी आरोपी मोहम्मद वशी याला त्याच्या आईने पत्नी कुठे दिसत नसल्यामुळे विचारणा केली. त्यावेळी उडावाउडवीची उत्तरं दिल्यामुळे आईने थेट पोलिस स्टेशन गाठलं. पोलिसांनी पत्नीची थेट चौकशी केल्यानंतर सगळं प्रकरण उजेडात आलं. पोलिसांनी पुरलेला मृतदेह उकरून काढला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केला आहे.