उत्तर प्रदेशच्या मेरठमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मेरठमध्ये एका महिलेनं आपल्या बॉयफ्रेंडच्या मदतीनं पतीची हत्या केली आहे. या महिलेचा पती खास लंडनवरून आपल्या बायकोचा वाढदिवस साजरा करण्यासाठी भारतामध्ये आला होता. मात्र मेरठमध्ये येताच त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.पत्नीने आधी त्याची हत्या केली, त्यानंतर तीने त्याचे हात कापले. त्याच्या मृतदेहाचे तब्बल 15 तुकडे केले. त्यानंतर तिने ते एका ड्रममध्ये घातले आणि त्या ड्रममध्ये सिमेंट ओतलं. त्यानंतर ही महिला आपल्या प्रियकरासोबत शिमल्याला गेली. मात्र जेव्हा 14 दिवसांनी ती घरी परतली तेव्हा तिच्या घरातून प्रचंड दुर्गंधी येत होती. त्यामुळे तिचा भांडाफोड झाला. पोलिसांनी तो ड्रम जप्त केला आहे.
ही घटना मेरठच्या ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या इंदिरा नगर परिसरात घडली आहे. 2016 ला मुस्कान आणि सौरभ यांचं लग्न झालं होतं. सैरभ कुमार याने मुस्कानसोबत लव्ह मॅरेज केलं होतं. काही वर्ष सर्व सुरळीत सुरू होतं. मात्र 2019 ला मोहित शुक्ला नावाचा व्यक्ती सौरभ कुमारच्या घरी रेंटने राहण्यासाठी आला. त्यानंतर मुस्कान आणि मोहित शुल्काची मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. काही दिवसांपासून मुस्कान आणि सौरभमध्ये वाद सुरू होता. पत्नीचा वाढदिवस होता, म्हणून सौरभ तिला सप्राईज देण्यासाठी अचानक लंडनहून मेरठला आला. त्याने आपल्या पत्नीसोबत वाढदिवस साजरा केला. मात्र त्यानंतर काही दिवसांनी सौरभ अचानक गायब झाला.
सौरभ अचानक गायब झाल्यामुळे त्याच्या भावाला संशय आला. त्याने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी जेव्हा सौरभच्या घरी जाऊन त्याच्या बायकोची चौकशी केली तेव्हा या घटनेचा भांडाफोड झाला. तिच्या घरात असलेल्या एका ड्रममधून प्रचंड दुर्गंधी येत होती. पोलिसांनी हा ड्रम उघडण्याचा प्रयत्न केला. त्या ड्रममध्ये पोलिसांना मृतदेहाचे पंधरा तुकडे आढळून आले आहेत. समोरचं दृश्य पाहून पोलिसांना प्रचंड धक्का बसला. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.