लखनऊ : पती-पत्नीचं नातं हे विश्वासावर चालत असतं. विश्वासावरच सुखी संसार निर्माण होतो. पण यात दोघांपैकी एकाने जरी विश्वास गमावला तर संसाराची राखरांगोळी होते. लखनऊच्या एका गावात अशीच एक घटना घडली आहे. पवित्र नात्याला काळीमा फासून पत्नीने नवऱ्याचा विश्वास गमावला. जेव्हा नवऱ्याला ही गोष्ट कळली तेव्हा पत्नीच त्याचा काळ बनून आली. केवळ पत्नीच नव्हे तर त्याचा सख्खा भाऊही त्याच्या विरोधात गेला.
दीराच्या प्रेमात वेड्या झालेल्या पत्नीने आपल्याच पतीचा काटा (wife killed husband) काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एवढेच नव्हे तर पतीची हत्या करून एका शौचालयाच्या खड्ड्यातच त्याचा मृतदेहही त्यांनी पुरला. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील एका गावात हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. खुनाच्या आरोपाखाली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की साकर हा ६ जून पासून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह निर्माणाधीन शौचालयाच्या खड्ड्यात सापडला असून त्याच्या गळ्यात पत्नीची ओढणीही सापडल्याचे समजते.
दिराशी होते प्रेमसंबंध, पतीला कळल्यावर काढला काटा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साकरची पत्नी आसिया हिचे तिच्या दिराशी अवैध संबंध होते. साकरला ही गोष्ट कळताच त्याने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने त्याचे काहीएक ऐकले नाही. धक्कादायक बाब म्हणजे, तिने आपल्याच पतीला मारण्याची योजना आखली. तिने दीरासोबत मिळून पतीची हत्या केली आणि त्याचा मृतदेह शौचालयाच्या खड्ड्यात पुरला.
त्यानंतर पती बेपत्ता झाल्यामुळे दु:खी झाल्याचे दर्शवले. मृतदेह पुरलेल्या जागेतून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर तिने तिथे धूप-उदबत्ती पेटवली. याबद्दल शेजाऱ्यांनी प्रश्न विचारले असता, पती लवकर सापडावा म्हणून एका बाबांनी हा उपाय करायला सांगितल्याची थाप तिने मारली.
साकर बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार नोंदवली होती. बऱ्याच तपासानंतरही साकरचा काहीच पत्ता लाागला नाही. अकेर पोलिसांनी संशयाच्या आधारावर साकरची पत्नी व त्याचा भाऊ या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी त्यांचा गुन्हा कबूल केला. आपण दोघांनीच साकरची हत्या केल्याचे कबुली त्यांनी दिली. त्याचा मृतदेह आधी खड्ड्यात पुरल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतप पोलिसांनी खड्डा खोदून साकरचा मृतदेह बाहेर काढला असून तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. या हत्येप्रकरणी साकरची पत्नी व त्याचा भाऊ या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.