नवी दिल्ली : ही घटना छत्तीसगडच्या (Chhattisgarh) सुरजपूर जिल्ह्यातली आहे. जयनगर पोलीस ठाण्याअंतर्गत करवा गाव आहे. पती दारुच्या नशेत होता. त्यामुळं पत्नीनं त्याला शारीरिक संबंधास (physical intercourse) नकार दिला. संतापलेल्या पतीने शस्त्राने पत्नीचा गळा कापला. आवाज ऐकून भाऊ तिथं आला. त्यालाही ब्लेडने जखमी केले. त्यानंतर आरोपी पसार झाला. पोलिसांनी लटोरी चौकातून आरोपीला अटक केली.
लटोरी चौकीचे प्रभारी धनंजय पाठक यांनी सांगितलं की, करवा येथील प्राणसाय राजवाडे (वय ३२ वर्षे) काल रात्री नशेत असताना घरी आला. त्यानंतर त्याचा पत्नी लालीबाईसोबत वाद झाला. प्राणसाय राजवाडेची आई माँ प्रेमकुमारी हिने दोघांना समजविण्याचा प्रयत्न केला.
जेवण झाल्यानंतर प्राणसाय आपल्या खोलीत झोपायला गेला. त्याची पत्नी खोलीत आल्यानंतर त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. तिने शारीरिक संबंधात मनाई केली. संतापलेल्या प्राणसायने पत्नीच्या गळ्यावर शस्त्राने वार केले.
पत्नीचा आवाज ऐकूण प्राणसायची आई प्रेमकुमारी तसेच भाऊ अर्जून राजवाडे घटनास्थळी पोहचले. प्राणसायला पकडण्याचा प्रयत्न केला. प्राणसायने ब्लेड मारून अर्जून राजवाडेलाही जखमी केले. पत्नी हल्ल्यात जखमी झाली. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर प्राणसाय पसार झाला.
पोलीस ठाण्यातील चौकी प्रभारी धनंजय पाठक यांनी सांगितलं की, लटोरी पोलीस टीम घटनास्थळी पोहचली. सकाळी पोलिसांनी आरोपी प्राणसायला लटोरी चौकातून अटक केली. आरोपीविरोधात ३०२, ३२३ नुसार गुन्हा दाखल केला. मृतक पत्नीच्या शवविच्छेदनानंतर प्रेत कुटुंबीयांना सोपविण्यात आला.