Kolhapur Crime : ती आधी मुलांचं अपहरण करायची अन् नंतर दुसऱ्या राज्यात नेऊन .. आरोपी महिलेला अखेर अटक

| Updated on: Sep 06, 2023 | 11:11 AM

आरोपी महिलेचं हेच काम होतं. आठवडाभरापूर्वी तिने दोन मुलांच अपहरण केलं होतं. ती त्यांना दुसऱ्या राज्यात घेऊन गेली आणि ....

Kolhapur Crime : ती आधी मुलांचं अपहरण करायची अन् नंतर दुसऱ्या राज्यात नेऊन .. आरोपी महिलेला अखेर अटक
Follow us on

कोल्हापूर | 6 सप्टेंबर 2023 : राज्यातील गुन्ह्यांचे प्रमाण (crime news) वाढतच चालले असून अशीच एक घटना कोल्हापूरमध्ये उघडकीस आली आहे. तेथे मुलांचं अपहरण (kidnapping) करून दुसऱ्या राज्यात नेणाऱ्या एका नराधम महिलेला अखेर अटक करण्यात आली आहे. तिने अपहरण केलेल्या दोन मुलांचीही सुखरूप सुटका करण्यात आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. अपहरण केलेल्या मुलांनी शक्कल लढवून घरच्यांशी संपर्क साधल्याने हा गुन्हा उघडकीस आला आणि मोठं रॅकेट उध्वस्त झालं.

मिळालेल्या माहितीनुसार, आठवड्याभरापूर्वी कोल्हापूरमधील कनाननगर परिसरातून दोन अल्पवयीन मुलाचं अपहरण झालं होतं. मुलं सापडत नसल्याचे लक्षात त्यांच्या पालकांची अवस्था अतिशय वाईट झाली होती. सर्वत्र सोधीनही मुल न सापडल्याने त्यांनी पोलिसांतही धाव घेतली. पोलिसांनी याची दखल घेत तातडीने तपास सुरू केला. मात्र तरीही मुलं कुठेच सापडली नाहीत.

असा उघडकीस आला गुन्हा 

दरम्यान आरोपी महिलेने त्या दोन मुलांचं अपहरण केल्यानंतर त्यांना हैदराबादमध्ये नेऊन भीक मागायला लावली. मात्र त्या दोन अल्पवयीन मुलांपैकी भिमा या एका मुलाने शक्कल लढवली. त्याने कसाबसा मोबाईल मिळवला आणि कोल्हापुरात त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. त्यांनी तातडीने पोलिसांना ही माहिती दिली असता शाहूपुरी पोलिसांनी कसून शोध घेत अखेर त्या महिलेला अटक केली. काजल सूर्यवंशी असे आरोपी महिलेचे नाव