क्रूरतेचा कळस ! शेजारणीकडून अवघ्या 5 वर्षांच्या मुलीस मारहाण,चटकेही दिले; कारण ऐकून डोकंच फिरेल

| Updated on: Jan 04, 2025 | 8:36 AM

एखाद्याच्या डोक्यावर राग एवढा हावी होऊ शकतो की समोरच्याला त्रास देण्यासाठी व्यक्ती कोणत्याही थराला जाऊ शकते. अशीच एक क्रूरतेचा कळस गाठणारी भयानक घटना मुंबईत घडली आहे. गोवंडी येथे एका महिलेने शेजारी राहणाऱ्या अवघ्या 5 वर्षांच्या मुलीला पकडून तिला बेदम मारहाण केली

क्रूरतेचा कळस ! शेजारणीकडून अवघ्या 5 वर्षांच्या मुलीस मारहाण,चटकेही दिले; कारण ऐकून डोकंच फिरेल
Follow us on

रागाच्या भरात माणूस काय करू बसतो हे ना त्याला समजतं, आणइ समोरच्याला उमजेपर्यंत खूप उशीर झालेला असतो. एखाद्याच्या डोक्यावर राग एवढा हावी होऊ शकतो की समोरच्याला त्रास देण्यासाठी व्यक्ती कोणत्याही थराला जाऊ शकते. अशीच एक क्रूरतेचा कळस गाठणारी भयानक घटना मुंबईत घडली आहे. गोवंडी येथे एका महिलेने शेजारी राहणाऱ्या अवघ्या 5 वर्षांच्या मुलीला पकडून तिला बेदम मारहाण केली, एवढंच नव्हे तर पक्कड गरम करून तिच्या पायाला चटकेही दिल्याचा क्रूक प्रकार समोर आला आहे. आणि हे सगळं करण्यामागचं कारण तर एवढ फडतूस आहे की ते वाचून कोणाचंही डोकं फिरेल.

घरात पाळलेले मांजर लपवून ठेवलं म्हणून ती महिला त्या मुलीवर भडकली आणि त्या छोट्याश्या चुकीसाठी तिने त्या मुलीला बेदम चोप देत अमानुषपणे पायाला चटकेही दिल्याची भयाक घटना गोवंडीच्या शिवाजीनगर येथे घडली आहे. याप्रकरणी सोहेल मोहम्मद तालीम शेख यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली असून त्यानंतर पोलिसांनी निषाद मोहम्मद उमर शेख (38) या महिलेला अटक केली.

नेमकं झालं तरी काय ?

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही गोवंडीतील शिवाजीनगर भागात राहते. तिने घरात एक मांजर पाळली आहे. तिच्या शेजारी राहणाऱ्या एका लहान मुलीने ( वय 5) आरोपी महिलेचे मांजर लपवून ठेवले होते. मात्र या घटनेचा आरोपी महिलेला प्रचंड राग आला आणि त्याच रागाच्या भरात आपण काय करतोय याचेही भान तिला राहिलं नाही. तिने त्या मुलीच्या डोक्यात लोखंडी पक्कड मारील, तिला मारहाणही केली एवढंच नव्हे तर तीच लोखंडी पक्कड गरम करून त्या महिलेने अवघ्या 5 वर्षांच्या चिमुरड्या मुलीच्या उजव्या पायावर चटकेही दिले. भाजल्याने ती मुलगी वेदनेने किंचाळत होती, पण आरोपी महिलेला जराही दया आली नाहीय

याप्रकरणी सोहेल मोहम्मद तालीम शेख (वय 26) यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत त्या महिलेविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिला अटक करत तिची चौकशी केली. या घटनेत ती मुलगी बरीच जखमी झाली असून तिच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार करण्यात आले व त्यानंतर तिला घरी पाठवण्यात आले.