उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशात एक लज्जास्पद घटना उघडकीस आली आहे. जमिनीच्या वादा (Land Dispute)तून एका महिलेला निर्दयीपणे मारहाण (Beatened) करण्यात आल्याचे एका व्हिडिओतून समोर आले आहे. हा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हे प्रकरण जिल्ह्यातील तिंदवारी गावातील आहे. व्हिडिओमध्ये काही महिला आणि तरुण एका महिलेला बेदम मारहाण करत असल्याचे दिसत आहे. या लोकांनी महिलेला जोरदार लाथाबुक्क्या मारल्या, मग तिचे केस ओढले आणि कपडेही फाडले. नराधम लोक एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यानंतर महिलेच्या मोठ्या दिराने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची टाकली. महिलेला तिच्या कुटुंबीयांनी मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. मारहाण करणाऱ्यांनी तिच्यासोबत अश्लील कृत्यही केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
हा व्हिडिओ 25 जुलैचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. महिलेला मारहाण करतानाचे दोन व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. एका घरात काही महिला एका महिलेला मारहाण करत आहेत, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये एक पुरुष तिचे केस ओढून तिला रस्त्यावर लोळवत आहे. जमिनीच्या वादातून कुटुंबातील काही सदस्य तिच्या घरात घुसल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले. आधी महिलांनी तिला बेदम मारहाण केली, त्यानंतर मोठा दिर आणि पुतण्याने तिचे कपडे फाडले. त्याने तिच्यासोबत अश्लील कृत्य केले आणि तिच्या प्रायव्हेट पार्टवर मिरची पावडर टाकली. एवढेच नाही तर तिला बाहेर काढून अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावर फिरवले.
मोठ्या मुश्किलीने महिलेने स्वतःचा जीव वाचवला. त्यानंतर महिलेने पोलीस गाठत तक्रार नोंदवली, मात्र आरोपींवर कोणतीच कारवाई झाली नाही, असे महिलेने सांगितले. मात्र महिलेने तिच्या कुटुंबीयांवर मारहाण आणि अश्लील कृत्य केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांकडे व्हिडिओ आला आहे. गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली आहे, असे बांदाचे डीएसपी आनंद कुमार पांडे यांनी सांगितले. सध्या पोलीस पुढील कारवाई करत आहेत. (Woman beaten up by family over land dispute in Uttar Pradesh)