Crime News : गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार, धमक्या देऊन आरोपीने साडेतीन महिने…

| Updated on: Jan 17, 2023 | 1:42 PM

बागपत कोतवाली क्षेत्रातील एका गावातील महिलेचा पती पुर्णपणे दारुच्या आहारी गेला आहे. त्याचबरोबर तिचा पती कायम पत्नीसोबत वाद घालत असतो. त्याचा फायदा घेत तिथल्या एका व्यक्तीने महिलेशी गोड बोलून आणि छेड़छाड करीत शाररीक संबंध तयार करण्याचा प्रयत्न केला.

Crime News : गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार, धमक्या देऊन आरोपीने साडेतीन महिने...
CRIME NEWS
Follow us on

उत्तर प्रदेश – उत्तर प्रदेश (UP) राज्यातील बागपत (Baghpath City) शहरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेला गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला. त्यानंतर त्या महिलेला धमक्या देत आरोपीने साडेतीन महिने अत्याचार केला असल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे. आरोपीच्या त्रासाला महिला कंठाळली, त्यानंतर तिने पोलिस (Police) स्टेशन गाठून झालेला सगळा प्रकार सांगितला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यापासून परिसरात घबराहट पसरली आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, बागपत कोतवाली क्षेत्रातील एका गावातील महिलेचा पती पुर्णपणे दारुच्या आहारी गेला आहे. त्याचबरोबर तिचा पती कायम पत्नीसोबत वाद घालत असतो. त्याचा फायदा घेत तिथल्या एका व्यक्तीने महिलेशी गोड बोलून आणि छेड़छाड करीत शाररीक संबंध तयार करण्याचा प्रयत्न केला.


ज्यावेळी महिलेने विरोध केला त्यावेळी आरोपीने त्या महिलेला धमकी दिली. 23 ऑक्टोबर 2022 या दिवशी ती महिला तापाले फणफणत होती. त्यावेळी आरोपीने तापाच्या औषधात मिक्स करुन गुंगीचे औषध दिले. त्यानंतर बेशुध्द झालेल्या महिलेवरती बलात्कार केला.

हे सुद्धा वाचा

बलात्कार केल्याची कुठेही वाच्यता केल्यास जीवे-मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्या महिलेसोबत वाईट कृत्य करीत राहिला. पोलिसांनी त्या महिलेची तक्रार लिहून घेतली आहे. त्याचबरोबर चौकशी करण्यात येणार आहे.