पुणे – काठीने बेदम मारहाण केल्याने मांजराचा (Cat) मृत्यू झाला आहे. ही घटना गोखलेनगर (Gokhalenagar) भागात उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत दत्तात्रय गाठे यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police) या प्रकरणी फिर्याद दिली आहे. चतुःशृंगी पोलीसांनी शिल्पा नीलकंठ शिर्के या महिलेच्या विरोधात प्राण्यांना क्रूरतेने वागणूक दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत गाठे याचे पाळीव मांजर शिल्पा शिर्के यांच्या घरात शिरल्याने त्यांना राग आला होता. त्यामुळे शिल्पा शिर्के यांनी काठीने त्या मांजराला मारहाण केली. या मारहाणीत मांजराचा मृत्यू झाला, त्यानंतर शिर्के यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. महाराष्ट्रात प्राण्यांना मारल्याच्या अनेक घटना उघडकीस येत असतात.
महाराष्ट्रात प्राणी प्रेम प्रचंड पाहायला मिळतं. तसेच प्राण्यांची एखाद्या घरातल्या कुटुंबाप्रमाणे काळजी घेणारे अनेक नागरिक सुध्दा तुम्हाला आढळतील. पुण्यात घडलेला प्रकार अत्यंत किळसवाणा असल्याचे समोर आले आहे. पाळीव मांजर सारखे घरात येत असल्याने मारहाण केली आणि त्यात मांजराचा मृत्यू झाला अशी मांजर मालकाची तक्रार आहे. परंतु या प्रकरणाची अधिक तपासणी केल्यानंतर नेमका मांजराचा मृत्यू कशामुळे झाला हे सिद्ध होईल. शिल्पा शिर्के यांच्या घरी प्रशांत दत्तात्रय गाठे यांचं पाळीव मांजर वारंवार जात होतं. त्यामुळे शिल्पा यांनी मांजराला क्रूरतेची वागणूक दिली. तसेच त्याला काठीने मारहाण केली आहे. काठीने मारहाण केल्याने मांजराचा मृत्यू झाला आहे अशी तक्रार पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.