काडीमोड न घेताच ती दुसऱ्यांदा बोहोल्यावर चढली, पतीला समजली बातमी अन्..

| Updated on: Mar 25, 2024 | 8:31 AM

लग्न हे विश्वासावर टिकलेलं नातं असतं. प्रेम, माया, ओढ हे सगळंही महत्वाचं असलं तरी लग्नात एकमेकांवर, जोडीदारावर विश्वासच नसेल तर ते नातं पोकळ ठरतं आणि आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. अशीच एक घटना नोएडामध्ये घडल्याचे समोर आले. तिथे एका विवाहीत महिलेने पहिल्या पतीशी काडीमोड न घेताच दुसऱ्या इसमाशी लग्न केलं.

काडीमोड न घेताच ती दुसऱ्यांदा बोहोल्यावर चढली, पतीला समजली बातमी अन्..
Follow us on

लग्न हे विश्वासावर टिकलेलं नातं असतं. प्रेम, माया, ओढ हे सगळंही महत्वाचं असलं तरी लग्नात एकमेकांवर, जोडीदारावर विश्वासच नसेल तर ते नातं पोकळ ठरतं आणि आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. अशीच एक विश्वासघाताची, दुर्दैवी घटना नोएडामध्ये घडल्याचे समोर आले. तिथे एका विवाहीत महिलेने पहिल्या पतीशी काडीमोड न घेताच दुसऱ्या इसमाशी लग्न केलं. जेव्हा तिच्या पतीला ही गोष्ट समजली तेव्हा त्याला मोठा धक्का बसला. खचलेला तो इसम आजारी पडला आणि थोड्याच दिवसात त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. आता याप्रकरणी मृत इसमाच्या आईने, त्याच्या पहिल्या पत्नीसमवेत तीन लोकांविरोधात सेक्टर 126मधील पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोएडा येथे छाया सिंह या त्यांच्या कुटुंलबासोबत राहतात. त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या सांगण्यानुसार, 24 एप्रिल 2022 रोजी त्यांचा मुलगा निमिष यांचं लग्न झालं. मात्र लग्नानंतर काही काळातच त्यांचा मुलगा खूप त्रस्त दसू लागला, त्याला मानसिक ताण-तणाव जाणवत होता.

29 जानेवारी 2024 रोजी त्याचा मृत्यू झाला. नंतर समजलं की निमिष याची पत्नी, अमिता सिंह ही आधीपासूनच विवाहीत होती. आणि तिने पहिल्या
पतीला घटस्फोट न देताच निमिष याच्याशी दुसरं लग्न केल होतं. तक्रारदार महिलेच्या सांगण्यानुसार, त्यांचा मुलगा, निमिष याच्या मृत्यूनंतर त्याच्या सासरच्या लोकांचं वागणं खूप बदललं आणि ते मुलीला नेण्याबाबत बोलू लागले. अखेर 15 फेब्रुवारी 2024 रोजी निमिषच्या आईला समजलं की त्यांच्या सुनेचं 2013 सालीच लग्न झालं होतं. तिने एका इसमाशी रजिस्टर मॅरेज केलं होतं.

12 फेब्रुवारी 2024 पर्यंत तिचा घटस्फोट झालाच नव्हता. अमिता सिंह आणि कुटुंबियांनी, निमिषची फसवणूक करून त्याच्याशी लग्न केलं होतं. याप्रकरणी निमिषची आी, छाया सिंह यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर अमिता सिंह, आणि तिच्या काही कुटुंबियांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.