छेडछाडीत तीचा चावा घेतला…नंतर केलं धक्कादायक आणि संतापजनक कृत्य…

| Updated on: Nov 04, 2022 | 9:19 PM

भररस्त्यात अंगलट करत असतांना महिलेने विरोध केला, याच वेळेला पिंटू गौतम याने महिलेच्या गालाला चावा घेतला. याशिवाय कानाचा चावा घेत कान तोडला आहे.

छेडछाडीत तीचा चावा घेतला...नंतर केलं धक्कादायक आणि संतापजनक कृत्य...
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : शहरात पोलिसांचा वचक राहिला नाही का ? असा प्रश्न आता नाशिककरांना पडू लागला आहे. खून, घरफोड्या, हल्ले, दुचाकी चोरी, हल्ले अशा घटना दिवसेंदिवस घडत असतांना नाशिकच्या दिंडोरी रोडवर संतापजनक आणि तितकीच धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. एका नराधमाने भर रस्त्यात एका महिलेचा विनयभंग केला आहे. या नराधमाने महिलेचा गालाचा आणि कानाचा चावा घेतल्याने तीचा कान तुटल्याची संतापजनक बाबही समोर आली आहे. महिलेचा चावा घेतल्याने महिलेने जोरात आरडा-ओरड केल्याने संशयित पिंटू गौतम याने तिथून पळ काढला होता. पीडित महिलेने फिर्याद दिल्याने पंचवटी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपी पिंटू गौतम हा फरार असून त्याच्या मागावर नाशिक पोलीस आहे.

नाशिकच्या दिंडोरी रोड वर एक महिला जात होती तिच्याच ओळखीचा पिंटू गौतम हा तिथे आला होता. त्याने महिलेशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला.

भररस्त्यात अंगलट करत असतांना महिलेने विरोध केला, याच वेळेला पिंटू गौतम याने महिलेच्या गालाला चावा घेतला. याशिवाय कानाचा चावा घेत कान तोडला आहे.

हे सुद्धा वाचा

एकूणच पिंटू गौतम याने महिलेचा भररस्त्यात विनयभंग केल्याने महिलेने जोरात आरडाओरड केली होती त्यामुळे परिसरात नागरिक जमले होते.

पीडित महिलेला नागरिकांनी जवळच असलेल्या खाजगी रुग्णालयात दाखल केले होते, त्यानंतर पीडित महिला थेट पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेली होती.

एकूणच या घटणेने परिसरात महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून अशा प्रवृत्तीला पोलीसांनी ठेचलं पाहिजे अशी मागणी महिला वर्गाकडून जोर धरू लागली आहे.