Video : महिला पायलटला जमावाने दिला चोप, पतीचीही केली धुलाई; घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीला टॉर्चर केल्याचा आरोप

| Updated on: Jul 19, 2023 | 4:12 PM

अल्पवयीन मुलीला टॉर्चर करण्यात आल्याचे समजताच नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांनी कारवाई करण्यापूर्वीच जमावाने दांपत्याची धुलाई केली.

Video : महिला पायलटला जमावाने दिला चोप, पतीचीही केली धुलाई;  घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीला टॉर्चर केल्याचा आरोप
Follow us on

नवी दिल्ली / 19 जुलै 2023 : एका अल्पवयीन मुलीला कामावर ठेवून तिला मारहाण केल्याचा आरोप असणाऱ्या दांपत्याला संतापलेल्या जमावाने चोप (couple was beatn by mob) दिल्याची घटना राजधानीत घडली आहे. या घटनेचा व्हिडीओही समोर आला असून त्यामध्ये एका महिला पायलट (woman pilot and husband) व तिच्या पतीची सर्वांसमोर धुलाई होत असल्याचे दिसत आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून जमावाला रोखले. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे.

दिल्लीतील द्वारका परिसरात हा प्रकार घडला. १० वर्षांच्या अल्पवयीन मुलीला टॉर्चर केल्याच्या आरोपाखाली महिला पायलट आणि तिच्या पतीला जमावाने मारहाण केली. ही मुलगी त्यांच्या घरी काम करत होताी, मात्र तिच्यावर चोरीचा आळ घेऊन या दांपत्याने तिला टॉर्चर केल्याचा, तिचा छळ केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या अत्याचारानंतर पीडित मुलगी तिथून पळून गेली आणि तिच्या कुटुंबियांना या संपूर्ण प्रकाराची माहिती दिली.

 

 

दिल्ली पोलिसांच्या सांगण्यानुसार, या मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून, आरोपी पती-पत्नीवर कलम 323, 324, 342 आणि बालकामगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

नेमकं काय झालं ?

द्वारका येथील डीसीपी हर्षवर्धन यांनी सांगितले की, या (अत्याचार) प्रकरणाची तक्रार मिळाल्याननंतर आम्ही घटनास्थळी दाखल झालो, तेथे १० वर्षांची मुलगी घरकामासाठी मदतनीस म्हणून होती. तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता तिच्या अंगावर अनेक जखमा आणि भाजल्याच्या खुणा आढळून आल्या. त्याच आधारे केस दाखल करण्यात आली असून त्या दांपत्याला अटक करण्यात आली आहे. त्या अल्पवयीन मुलीचे काऊन्सिलिंग करण्यात येत आहे, असेही त्यांनी नमूद केले. तिने

या दांपत्याने दोन महिन्यांपूर्वी या मुलीला कामावर ठेवले होते. कुटुंबियांना तिच्या अंगावर जखमा दिसताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच मुलीच्या नातेवाईकांनी व इतर लोकांनी पती-पत्नीला चोप देण्यास सुरूवात केल्याचे समजते.