विभक्त राहणाऱ्या पत्नीला भेटायला गेला, बायकोने रॉकेल टाकून त्यालाच पेटवलं, कुठे घडली ही धक्कादायक घटना ?

| Updated on: Jan 16, 2025 | 1:39 PM

पतीने पत्नीचा छळ केल्याच्या, मारहाण केल्याच्या किंवा अगदी वाईटात वाईट तिचा जीव घेतल्याच्या अनेक बातम्या आपल्या कानांवर येत असतात. ते ऐकून जीव हादरतोच. पण बुलढाण्यात याच्या उलट पण तेवढीच भयानक घटना घडली आहे.

विभक्त राहणाऱ्या पत्नीला भेटायला गेला, बायकोने रॉकेल टाकून त्यालाच पेटवलं, कुठे घडली ही धक्कादायक घटना ?
Follow us on

पतीने पत्नीचा छळ केल्याच्या, मारहाण केल्याच्या किंवा अगदी वाईटात वाईट तिचा जीव घेतल्याच्या अनेक बातम्या आपल्या कानांवर येत असतात. ते ऐकून जीव हादरतोच. पण बुलढाण्यात याच्या उलट पण तेवढीच भयानक घटना घडली आहे. बुलढाण्यात एका महिलेने तिच्याच पतीवर पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिल्याची खळबजनक घटना घडली आहे. बायकोने नवऱ्याला पेट्रोल टाकून पेटवलं आणि या घटनेत 80 टक्के भाजलेल्या इसमाचा उपचारांदरम्यान दुर्दैवाने मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. बुलढाणा जवळील सुंदरखेड मधील ही घटना असून आरोपी पत्नी लता गवई हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी महिला फरार असून पोलिसांनी तिच्या शोधासाठी पथके पाठवली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादातून हा भयानक प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. रणधीर हिंमत गवई असे मृताचे नाव आहे. तो पत्नीपासून विभक्त रहात होता. विभक्तपणे राहाणारा हिंमत हा पल्या पत्नीस भेटण्यासाठी सोमवारी रात्री बुलढाणा येथे गेला होता. मात्र आरोपी महिला लता हिने तिच्या पतीच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून दिले. पीडित मृत इसम हा सेवानिवृत लष्करी जवान होता. या घटनेत तो 80 टक्के भाजल्याने गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी पत्नी लता गवई हिच्यावर बुलढाणा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पत्नी फरार आहे . तर मृत्यू झालेले रणधीर हे मेहकर तालुक्यातील पाचला येथे राहणारे आहेत. घटनेच्या दिवशी रणधीर हे आपली पत्नी लता गवई हिला भेटण्यासाठी आले होते, मात्र यावेळी दोघात वाद झाला आणि पत्नीने रणधीर याना पेट्रोल टाकून जाळून टाकले . आरोपी महिलेला तत्काळ अटक करण्याची मागणी मृतकाचे नातेवाईकांनी केली आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून फरार महिला आरोपच्या शोधासाठी पोलीस पथके पाठवण्यात आली आहेत.