लिव्ह-इन पार्टनरसोबत सतत व्हायचे वाद, रागाच्या भरात महिला नको तेच करून बसली ! थेट…

| Updated on: Sep 08, 2023 | 3:32 PM

banglore Live-in Partner Murder : आरोपी महिला ही तिच्या पार्टनरसोबत लिव्ह -इन रिलेशनशिपमध्ये होती. घटनेच्या दिवशी त्यांच्यामध्ये शुल्लक कारणावरून भांडण झाले आणि बघता बघता त्याचे मोठ्या वादत रुपांतर झाले. रागाच्या भरात तिने थेट...

लिव्ह-इन पार्टनरसोबत सतत व्हायचे वाद, रागाच्या भरात महिला नको तेच करून बसली ! थेट...
Follow us on

बंगळुरू| 8 सप्टेंबर 2023 : देशातील गुन्हेगारीच प्रमाण आणि त्याची तीव्रता वाढत आहेत. रागाच्या भरात लोक क्षणात काहीतरी अशी कृती करतात, ज्याच्याबद्दल आयुष्यभर पश्चाताप करूनही फायदा होत नाही. अशीच एक घटना मेट्रो सिटी बंगळुरूमधून (banglore) घडल्याचे समोर आले आहे. तेथे एका महिलेने तिच्या लिव्ह-इन पार्टनरवर (live in relation) केवळ जीवघेणा हल्लाच केला नाही , तर त्याचा जीवही (attack on partner) घेतला. रेणुका (वय ३४) असे आरोपी महिलेचे नाव असून जावेद असे (वय २९) असे मृत तरूणाचे नाव असल्याचे समजते. हुलीमावू पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी ही घटना घडली. मृत तरुण हा मूळचा केरळचा आहे.

बंगळुरू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणुका व जावेद हे दोघेही लिव्ह -इन रिलेशनशिपमध्ये होते. ते हुलीमावू पोलिस स्टेशनच्या हद्दीतील अक्षय नगरमधील सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये राहत होती.घटनेच्या दिवशी त्यांच्यात काही कारणावरून भांडण झाले आणि ते इतके वाढले की रेणुकाने पुढचा-मागचा काहीच विचार न करता तिच्या साथीदारावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. यादरम्यान जावेदच्या छातीवर चाकू लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता, रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रेणुका ही मूळची बेळगावची असून मृत तरूण जावेद हा केरळचा रहिवासी आहे. दोघेही मोबाईल सर्व्हिसिंगचे काम करत असत आणि सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये रहायचे. आजूबाजूच्या नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ते लिव्ह-इनमध्ये असले तरी त्यांच्यात सर्वकाही आलबेल नव्हतं, रोज काही-ना काही कारणावरून त्यांच्यात वाद व्हायचे. हत्येच्या दिवशीही त्यांच्याच एका कारणावरून भांडण झाला आणि बघता-बघता त्याचं मोठ्या वादात रुपांतर झालं. रागाच्या भरात रेणुका हिने जावेदवर चाकूने वार केला. त्यांचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी घरात धाव घेतली, तेव्हा जावेद हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याला तातडीने रुग्णालयात नेले जात होते, मात्र त्याने रस्त्यात अखेरचा श्वास घेतला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून रेणुकाला ताब्यात घेतले आहे. या घटनेबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.