चाकुने सपासप वार, महिलेच्या हत्येने परळी हादरली, हत्येचं कारण काय?

| Updated on: Feb 26, 2022 | 10:54 PM

एका महिलेची (Lady Murder) चाकून सपासप वार करून हत्या करण्यात आलीय. या महिलेच्या हत्येचने परळीत सध्या दहशतीचे (Crime) वातावरण निर्माण केले आहे.

चाकुने सपासप वार, महिलेच्या हत्येने परळी हादरली, हत्येचं कारण काय?
महिलेची वार करून हत्या
Image Credit source: tv9
Follow us on

बीड : कौटुंबिक वादातून किंवा पैशाच्या वादातून अनेकदा टोकाचे संघर्ष आपण पाहत असतो. मात्र हा संघर्ष ज्यावेळी रागात बदलतो त्यावळे हत्येसारखे (Murder) गुन्हे जन्म घेतात. असाच एक प्रकर बीडमधील परळीत घडलाय. एका महिलेची (Lady Murder) चाकून सपासप वार करून हत्या करण्यात आलीय. या महिलेच्या हत्येचने परळीत सध्या दहशतीचे (Crime) वातावरण निर्माण केले आहे. परळी शहरा जवळील आयेशा नगर येथे एका 50 वर्षीय महिलेची चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आली. यात या महिलेचा जीव तर गेलाच मात्र या हत्येवेळी काही जण जखमीही झाले आहेत. यात पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मात्र या हत्येने परळीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला आहे. या हत्येने पोलिसांसमोरही मोठे आव्हान निर्माण केले आहे. यात आता लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांची धडपड सुरू आहे.

अवघ्या चार तासात आरोपी ताब्यात

या हल्ल्यात या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या हल्ल्यात महिलेची 16 वर्षीय मुलगी देखील जखमी झाली आहे. मयत महिलेचे नाव शेख मदिना शेख मंजीद आणि मुलीचे नाव मुस्कान असल्याची माहिती समोर आली आहे. भर दिवसा घडलेल्या या घटनेने परळी शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान हा हल्ला आर्थिक व्यवहारातून झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जातोय. मात्र या हत्येचे स्पष्ट कारण अद्याप समोर आले नाही, या हत्येचे कारण काय आहे, याचा शोध सध्या परळी पोलिसांकडून सुरू आहे. ग्रामीण पोलिसांनी अवघ्या चार तासात आरोपीला ताब्यात घेतले आहे.

पोलीसांनी तपास वेगवान केला

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आता तपासाला अधिक वेग आला आहे. पोलिसांकडून या हत्येबाबत अध्याप कोणतीही स्पष्ट मोहिती देण्यात आली नाही, त्यामुळे या हत्येमागील स्पष्ट कारण समजू शकले नाही. त्यामुळे उद्यापर्यंत या प्रकरणात अधिक स्पष्टात येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून आणखा काही महत्वाचे धागेदोरे लागण्याची शक्यता आहे. पोलीस तपासात आणखी काही महत्वाच्या बाबती समोर येण्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र हत्येचे कारण तपासानंतरच समोर येईल.

Gujrat : ग्रीष्मा हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल, तालिबानी पद्धतीने हत्येने देश हादरलेला

महावितरण अधिकाऱ्यांच्या टेबलावर साप सोडणं महागात, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा

फोन टॅपिंगप्रकरणी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल, चौकशी समितीच्या अहवालात नेमकं काय म्हटलं?