मुंबई : एका शिक्षिकेने (Teacher) विद्यार्थ्यासोबत (Student) कारमध्ये (Car) जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. त्यामुळे शिक्षिकेवरती जोरदार टीका होत आहे. ज्या शिक्षिकेने विद्यार्थ्याशी संबंध ठेवले आहे, त्या शिक्षिकेचं वय 24 आहे. तसेच ती शिक्षिका तीचं उच्च शिक्षण घेतं आहे.
विशेष म्हणजे हे उजेडात आलेलं प्रकरण अमेरिकेमधील आहे. चोवीस वर्षाची एना लेह डी ही शिक्षिका एटोरे लकोटा लोकल शाळेत विद्यार्थ्यांना शिकवते. विद्यार्थ्याशी संबंध ठेवल्यामुळे शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे. शिक्षिकेला जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्या प्रकरणावर आता सुनावणी होणार आहे.
हे प्रकरण उजेडात आल्यापासून शिक्षिकेवर जोरदार टीका करण्यात आली आहे. तसेच असा प्रकार घडत असल्याचे अनेकदा उजेडात आले आहेत.
पुढच्या सुनावनीच्यावेळी त्या शिक्षिकेला शिक्षा होण्याची शक्यता आहे. सध्या त्या शिक्षिकेची कसून चौकशी सुरु असून अन्य विद्यार्थ्यासोबत असा प्रकार घडला आहे का ? याची पोलिस चौकशी करीत आहेत.