कुत्र्यांना बिस्कीटे आणि खाद्यपदार्थ दिली… नाशिकमध्ये राडा…वाद गेला पोलीस ठाण्यात, काय घडलं?

| Updated on: Dec 05, 2022 | 10:52 AM

लाटे नगर परिसरात राहणाऱ्या एक महिला आणि त्यांची मुलगी भटक्या कुत्र्यांना बिस्किटे आणि खाद्यपदार्थ खाण्यासाठी देत असल्याने कुत्र्यांची मोठी गर्दी होत असते.

कुत्र्यांना बिस्कीटे आणि खाद्यपदार्थ दिली... नाशिकमध्ये राडा...वाद गेला पोलीस ठाण्यात, काय घडलं?
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : नाशिकमधील हिरावाडी येथील कुत्र्यांवर सुरुवातीला झालेली बाचाबाची आणि त्यामध्ये झालेली हाणामारी थेट पोलीस ठाण्यात जाऊन पोहचली आहे. नाशिकच्या हिरावाडी परिसरातील लाटे नगर परिसरातील ही घटना आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये दोन महिला भटक्या कुत्र्यांना बिस्किटे, खाद्यपदार्थ खायला टाकतात, त्यामुळे परिसरात जमलेले कुत्रे नागरिकांना चावत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे सुरुवातील शाब्दिक वाद झाला आणि त्यानंतर स्थानिकांनी महिलेला आणि तिच्या मुलीला मारहाण केल्याची घटना केली आहे. या घटनेचा वाद पोलीस ठण्यात जाऊन पोहचल्याने जोरदार चर्चा होऊ लागली आहे. भटक्या कुत्र्यांवरुन झालेला वाद मारहाणी पर्यन्त जाऊन पोहचला होता, त्यामुळे पोलीस ठाण्यात जाऊन पोहचलेला वाद नाशिकमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

नाशिकच्या हिरावाडी परिसरात सुरू भटक्या कुत्र्यांवरुन सुरू झालेला वाद हाणामारी पर्यन्त जाऊन पोहचला आहे. पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

लाटे नगर परिसरात राहणाऱ्या एक महिला आणि त्यांची मुलगी भटक्या कुत्र्यांना बिस्किटे आणि खाद्यपदार्थ खाण्यासाठी देत असल्याने कुत्र्यांची मोठी गर्दी होत असते.

हे सुद्धा वाचा

महिला आणि मुलगी हे भटक्या कुत्र्यांना खायला देत असल्याने मोठ्या प्रमाणात कुत्रे जमा होतात, त्यामुळे परिसरात कुत्र्यांची मोठी वर्दळ होत असल्याने कुत्र्यांनी तीन ते चार मुलांना चावा घेतला आहे.

मुलांना चावा घेतल्याने नागरिकांनी महिला आणि मुलीला खाद्यपदार्थ टाकू नका म्हणूनस सांगितले होते, त्यात महिला आणि मुलीने दुर्लक्ष केले होते.

त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी महिलेला सुनावलं होतं मात्र, तरीही महिला आणि मुलीने दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी आक्रमक होऊन मारहाण केल्याची बाब समोर आली आहे.

वारंवार कुत्र्यांना खाद्यपदार्थ दिले जात असल्याने भटके कुत्रे मोठ्या प्रमाणात जमा होत असल्याने चावा घेण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने हा वाद टोकाला गेला आहे. विनयभंगाचा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.