यवतमाळ : यवतमाळ (Yavatmal) शहरातील एका सराफा व्यापाऱ्याच्या घरी सावकारी पथकाने (The lender team) धाड टाकून आक्षेपार्ह कागद पत्र जप्त केली. या कारवाईमुळे शहरातील अवैध सावकारांचे चांगलेच धाबे दणाणले असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी कागद पत्र पडताळणी नंतर महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार कारवाई (Proceedings under the Maharashtra Moneylending Act) करण्यात येणार आहे. गिरीश चंद्रकांत सुराणा असं कारवाई केलेल्या सराफा व्यापाऱ्याचे नाव आहे. आणखी काही ठिकाणी धाडी टाकण्यात येणार असल्याची सुध्दा माहिती मिळाली आहे. त्यामुळे अवैध सावकारांचे धाबे दणाणले आहेत.
अमरावती येथील राहुल श्रीधर राऊत यांनी सुराणा यांच्या शुभ लाभ ज्वेलर्स मधून साडेसहा लाख रुपयांचे दागिने खरेदी केले. त्या बदल्यात राऊत यांनी सुराणा यांना पुणे जिल्ह्याच्या जूनेगाव येथील 11 गुंठे जमिनीचे सौदे पत्र तयार करून दिले. त्यानंतर काही दिवसांनी राहुल श्रीधर राऊत यांनी सुराणा यांना दागिन्यांची संपूर्ण रक्कम परत केली. मात्र सुराणा यांनी अधिकच्या रकमेची मागणी केल्याची तक्रार राऊत यांनी यवतमाळ जिल्हा उपनिबंधकयांचे कडे केली.
त्यावरून उपनिबंधक यांनी पोलीस आणि महसूल विभागाच्या सहमतीने सुराणा यांच्या घरी धाड टाकली. या कारवाई दरम्यान सुराणा यांचे घरून आणि शुभ लाभ ज्वेलर्स मधून संशयास्पद कोरा चेक, खरेदी खत, बाँड पेपर, डायरी , पिवळ्या धातूच्या वस्तूसह महत्त्वाची 75 कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी उपनिबंधक कार्यालयाकडून चौकशी सुरू असून चौकशी अंती सावकारी अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती नानासाहेब चव्हाण निबंधक यांनी दिली आहे.