कर्ज नऊ लाखांचं वसूल केलेली रक्कम ऐकून धक्काच बसेल, खासगी सावकाराचा प्रकार पोहचला पोलीस ठाण्यात

| Updated on: Jan 04, 2023 | 4:37 PM

नाशिकमध्ये सावकारी जाचाला कंटाळून एका दाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतांना आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई नाका पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्ज नऊ लाखांचं वसूल केलेली रक्कम ऐकून धक्काच बसेल, खासगी सावकाराचा प्रकार पोहचला पोलीस ठाण्यात
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : सावकराच्या त्रासाला कंटाळून एका दांपत्याने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतांना मुंबई नाका पोलीस ठाण्यात एका खासगी सावकारीच्या संदर्भात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे, विशेष म्हणजे या गुन्ह्यात अवघ्या 9 लाख रुपयांना व्याजाच्या नावाखाली तब्बल 51 लाखांना लुटल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंबई नाक पोलीस ठाण्यात तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाल्याने या गुन्ह्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सुरेश पुजारी या हॉटेल व्यावसायिकाने खाजगी सावकार असलेल्या विजय शंकर देशमुख यांच्याकडून पाच टक्के दराने कर्ज घेतले होते. त्यानुसार हॉटेल व्यावसायिक सुरेश पुजारी यांनी व्याजाच्या रकमेसह 50 लाख 90 हजार रक्कम देशमुख यांना परत केली होती. मात्र इतकी मोठी रक्कम परत करूनही देशमुख यांनी 20 लाख रुपयांची मागणी केली आहे. वारंवार पैशांचा तगादा लावून जीवे ठार मारण्याची धमकी देशमुख यांनी दिली आहे. त्यांच्या मुलीलाही शिवीगाळ केल्याचा प्रकार घडल्याचे पोलीसांत दिलेल्या तक्रारी म्हंटले आहे.

नाशिक शहरातील हॉटेल व्यावसायिक सुरेश पुजारी यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात खासगी सावकरच्या जाचाला कंटाळून पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.

नाशिक शहरातील खासगी सावकार विजय शंकर देशमुख यांच्या विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

नऊ लाख रुपये सुरेश पुजारी यांनी खासगी सावकाराकडून पाच टक्के व्याजाने हे पैसे घेतले होती, त्यानुसार त्यांनी 50 लाख 90 हजार रुपये परत केले आहे.

यानंतरही पुजारी यांच्याकडे 20 लाखाची मागणी करत देशमुख याने 20 लाखांची मागणी केली आहे, त्यानंतर पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची बाब समोर आली आहे.

यामध्ये विशेष म्हणजे देशमुख याने पुजारी यांच्या मुलीलाही शिवीगाळ केल्याची बाब समोर आली आहे. यामध्ये हॉटेलवर मॅनेजर असलेल्या व्यक्तीलाही देशमुख याने धमक्या दिल्या आहे.

नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून खासगी सावकारीच्या घटना समोर येत असल्याने नाशिक पोलीसांनी याबाबत कठोर भूमिका गरजेचे झाले आहे.