Crime News : मागील आठवड्यात नाशिक शहरातील गंगापूर रोड (Nashik Crime News) परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाने घरातील लाखों रुपयांचे दागिने चोरल्याचे उघडकीस आले होते. त्यानुसार नाशिक पोलीसांनी (Nashik Police) तपास करत असतांना धक्कादायक माहिती समोर आली होती. अथर्व देशमुख नामक शालेय विद्यार्थी हा शालेय विद्यार्थ्यांशी मैत्री करायचा. त्यांनंतर त्यांना बंदुकीचा धाक दाखवून तो त्यांना पैसे चोरायला लावायचा. अनेक शालेय विद्यार्थ्यांना अथर्व याने चोरी करायला लावल्याचे समोर आले आहे. गंगापूर पोलीस ठाण्यात एका पटेल नामक व्यक्तीने घरातून दागिने चोरी गेल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार गंगापूर पोलीसांनी तपास करत असतांना त्यांच्याच मुलाने दागिने चोरल्याचे समोर आले होते. त्याचा तपास करत असतांना या धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत.
नाशिकच्या कॉलेज रोड परिसर, गंगापूर रोड अशा भागात वावर असलेल्या अथर्व देशमुख या तरुणाने मौज मजा आणि दहशत निर्माण करण्यासाठी गुन्हेगारीचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
श्रीमंत घरातील मुलांना ओळखून त्यांना बाहेर घेऊन जात बंदूक दाखवून भीती निर्माण करणे, त्यानंतर घरातील पैसे चोरून आणण्यास सांगणे, पैसे नाही मिळाले तर दागिने चोरने असे कृत्य अथर्व घडवून आणले जात होते.
अवघ्या 22 वर्षाचा अथर्व देशमुख याच्या विरोधात नाशिकच्या गंगापूर रोड पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार गंगापूर पोलीसांनी एक विशेष पथक त्याच्या मागावर लावले होते.
पंचवटीमध्ये लपून बसलेल्या अथर्वला नाशिक पोलीसांनी अटक केली असून त्याच्या बाबत आणखी चार तक्रारी दाखल झाल्या आहेत.
या घटणेने नाशिकच्या शैक्षणिक वर्तुळात भीतीचे वातावरण पसरले असून अथर्व देशमुख नामक भाईच्या अटकेची जोरदार चर्चा होत आहे.