नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत एक नव्या घटनेने खळबळ उडाली आहे. मौर्य एन्क्लेव्ह भागातील जीपी ब्लॉकमधील एका खोलीतून दुर्गंध येऊ लागल्यानंतर स्थानिकांनी पोलीसांना माहिती दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जोर लावून खोलीचा दरवाजा उघडला असता, आतील दृश्य बघून सर्वांचे (crime news) डोळे विस्फारले. खोलीत एक बर्थडे केक (cake) ठेवला होता, आणि त्याच्या शेजारीच एक तरूणाचा मृतदेह (dead body) आढळलल्याने सर्वच चमकले.
या खोलीतून खूपच दुर्गंध येऊ लागल्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी मौर्य एन्क्लेव्ह पोलीस ठाण्यात याची माहिती दिली होती. त्या खोलीत राहणाऱ्या २० वर्षीय तरूणाने टोकाचे पाऊल उचलत स्वत:चे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि त्याच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती दिली. प्रिंस असे या मृत तरूणाचे नाव असल्याचे समजते.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरूण गेल्या काही दिवसांपासून एका मुलीशी फोनवर सतत बोलत असे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी त्या मुलीचाच वाढदिवस होता. पोलिसांनी खोलीचा दरवाजा उघडल्यानंतर त्या मुलाच्या मृतदेहाच्या शेजारी त्यांना एक केक ठेवलेला आढळला. त्यावर हॅपी बर्थडेचा मेसेजही लिहीला होता. एवढी सगळी तयारी केल्यावरही त्या तरूणाने असे टोकाचे पाऊल का उचलले असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती नातेवाईकांना दिल्यावर रडून-रडून त्यांची अवस्था बिकट झाली होती.
तरूणाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून पिढील तपास सुरू आहे. त्या तरूणाने खरंच आत्महत्या करून आयुष्य संपवले की त्याच्या मृत्यूमागे इतर कोणाचा हात आहे, हे पोलिसांच्या चौकशीनंतर स्पष्ट होऊ शकेल. पोस्टमॉर्टमच्या अहवाालानंतर याप्रकरणातील अधिक माहिती समोर येऊ शकेल.