Bhandara : पूर्ववैमनस्यातून तरुणाची धारदार हत्याराने वार करून हत्या, मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात

| Updated on: Apr 18, 2022 | 10:53 AM

पूर्ववैमनस्यातून 35 वर्षीय युवकाची धारधार शस्त्राने वार करत हत्या केली. ही धक्कादायक घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या कारधा पोलिस स्टेशन (Kardha Police Station) हद्दित येणाऱ्या आमगाव येथे घडली आहे. 35 वर्षीय सम्येक मनोज मेश्राम (samyek meshram) असे मृतकाचे नाव आहे. सचिन ऊके वय 30 वर्ष असे आरोपीचे नाव आहे.

Bhandara : पूर्ववैमनस्यातून तरुणाची धारदार हत्याराने वार करून हत्या, मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात
पूर्ववैमनस्यातून तरुणाची धारदार हत्याराने वार करून हत्या
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

भंडारा – पूर्ववैमनस्यातून 35 वर्षीय युवकाची धारधार शस्त्राने वार करत हत्या केली. ही धक्कादायक घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या कारधा पोलिस स्टेशन (Kardha Police Station) हद्दित येणाऱ्या आमगाव येथे घडली आहे. 35 वर्षीय सम्येक मनोज मेश्राम (samyek meshram) असे मृतकाचे नाव आहे. सचिन ऊके वय 30 वर्ष असे आरोपीचे नाव आहे. आरोपी सचिनने कारधा पोलिसांना शरण आला आहे. मुख्य आरोपीचे सहकारी अन्य फरार आरोपींचा शोध कारधा पोलिस घेत आहेत. मृतक सम्येक याचा आरोपी सचिनशी जुन्या एका विषयामुळे वाद सुरु होता. अखेर त्याच्यातील वाद विकोपाला जाऊन सचिन ने सम्येक मेश्राम हत्या केली. कारधा पोलिस इतर आरोपींचा शोध घेत असून त्यांची कसून चौकशी करणार आहेत.

इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत

सम्येक मनोज मेश्राम आणि आरोपी यांच्यात पूर्वीच्या एका विषयावरून वाद सुरू होता. वारंवार यांच्यात खटके उडत होते. रविवारी सायंकाळच्या सुमारास सम्येक मनोज मेश्राम याला एकट्याला पाहून त्यांच्याशी मुख्य आरोपीने भांडायला सुरूवात केली. त्यावेळी वाद विकोपाला गेल्याने तलवार व रॉडच्या सहाय्याने वार केला. घटनास्थळी मुख्य आरोपीसोबत त्याचे मित्र देखील होतं. केलेल्या भयानक हल्ल्यात सम्येक रक्ताचा थारोळ्यात पडून जागीच गतप्राण झाला. घटनेनंतर सगळेच सुरुवातीला फरार झाले होते. पण आरोपी सचिन ऊके कारधा पोलिसाना शरण आला आहे. अन्य आरोपींचा शोध कारधा पोलिसांनी सुरु केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपी सचिन ऊके विरोधात हत्येचा गुन्हा नोंद करत अटक केली असून अन्य फरार आरोपींचा शोध सुरु आहे. आमगावात घडलेल्या या घटनेने गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

अधिक माहिती उघडकीस येण्याची शक्यता

इतर आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर अधिक माहिती उघडकीस येईल. त्यामुळे पोलिसांनी इतर आरोपींचा शोध सुरू केला आहे. जुन भांडण काय आहे ? त्या दिवशी नेमकं काय ? या सगळ्या प्रकरणाची पोलिस चौकशी करीत आहेत.

Accident : कंटेनरला पीकअपनं दिली धडक; मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरच्या अपघातात 1 ठार

Sanjay Raut: कोण कुणाच्या स्पॉन्सरशीपने राजकारण करत असेल तर करू द्या; राऊतांचा राज ठाकरेंना टोला

Breaking News : राज ठाकरेंच्या इशाऱ्याचे पडसाद, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची दुपारी बैठक, काय निर्णय होणार?