वेशांतर करुन घरात घुसला अन् तरुणावर जीवघेणा हल्ला केला, तरुणाच्या सतर्कतेमुळे आरोपी जेरबंद

| Updated on: Jan 07, 2023 | 7:22 PM

उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प रोडवर गुरुगोविंद पॅलेस नावाची इमारत आहे. या इमारतीत राहणाऱ्या बंटी वाधवानी यांच्या घरात सकाळी एक अनोळखी इसमाने वेशांतर करून प्रवेश केला.

वेशांतर करुन घरात घुसला अन् तरुणावर जीवघेणा हल्ला केला, तरुणाच्या सतर्कतेमुळे आरोपी जेरबंद
उल्हासनगरमध्ये तरुणावर हल्ला
Image Credit source: TV9
Follow us on

उल्हासनगर : वेशांतर करुन घरात घुसलेल्या अनोळखी आरोपीने तरुणावर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये उघडकीस आली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बंटी वाधवानी असे हल्ल्यात जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. महेश थारवानी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

सकाळी वेशांतर करुन घरात घुसला

उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प रोडवर गुरुगोविंद पॅलेस नावाची इमारत आहे. या इमारतीत राहणाऱ्या बंटी वाधवानी यांच्या घरात सकाळी एक अनोळखी इसमाने वेशांतर करून प्रवेश केला.

आरोपीला पाहून आरडाओरडा केल्याने आरोपीकडून हल्ला

बंटी हे आपल्या बेडरूममध्ये गेले असताना अचानक एक अनोळखी व्यक्ती दिसल्याने ते चोर चोर म्हणून ओरडू लागले. यावेळी हल्लेखोराने चाकूने बंटी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात बंटी यांच्या डोक्यावर, मानेवर, हातावर, पाठीवर आणि चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली असून, त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

हे सुद्धा वाचा

विठ्ठलवाडी पोलिसांकडून आरोपीला अटक

या घटनेची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचत आरोपी महेश थारवानी याला अटक केली. त्याने बंटीच्या घरात प्रवेश का केला? त्याचे यापूर्वी घरातील सदस्यांशी काही संबंध होते का? हल्ल्याचे कारण काय? याचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड हे करत आहेत.