सातारा : बैलांच्या शर्यती (bullock cart race) धोकादायक असल्यानं मध्यंतरी कोर्टानं त्यावर बंदी आणली होती. पण, त्यांना अखेर कोर्टानं मान्यता दिली. या शर्यतीत बैलांवर अत्याचार होतो, असा काहींचा आक्षेप होता. आता बैलांच्या शर्यती राज्यात सुरू आहेत. या शर्यतीदरम्यान सातारा (Satara) येथे ही घटना घडली. साताऱ्यात बैलगाडी खाली आल्यानं एका तरुणाचा मृत्यू झाला. या बैलगाडी शर्यतीसाठी परवानगी घ्यावी लागते. पण, या शर्यतीत परवानगी घेतली नसल्याची माहिती समोर आली. साताऱ्यातील बोरखळ येथे बैलगाडा शर्यतीदरम्यान एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे. पुष्कर पवार असं या तरुणाचे नाव आहे.
दोन बैलगाडींची धडक होवून अपघात झाला. बैलगाडीचं चाक अंगावरून गेल्याने या तरुणाचा मृत्यू झाला अशी माहिती समोर येते आहे. या तरुणाचा मृतदेह साताऱ्यातील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनसाठी आणण्यात आला. मोठ्या संख्येने नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली. या शर्यतीसाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शर्यती पाहण्यासाठी गर्दी झाली होती. बैलगाडींची धडक झाली. यात बाजूला बसलेल्या लोकांच्या अंगावरून एक बैलगाडी गेली. बैलगाडीचं चाक अंगावरून गेल्यानं तरुण जागीच ठार झाला. बैलगाडीच्या चाकाखाली तो आला. याशिवाय बैलांची खूर आणि ओझ्याखाली तो दबला गेला.
अपघातानंतर रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. यामुळं रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होती. या घटनेमुळं हळहळ व्यक्त केली जात आहे. तो तरुण बैलगाड्या शर्यती पाहण्यासाठी आला होता. पण, यात त्याला दुर्दैवी मृत्यू झाला.
बैलगाड्यांची शर्यत भरवायची असेल, तर त्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. पण, काही गावांमध्ये अजूही परवानगी घेण्यात येत नाही. त्यामुळं तिथं पोलीस बंदोबस्त नसतो. गर्दी होत असल्याचं त्यावर नियंत्रण ठेवणं आवश्यक असतं. अशा दुर्घटना घडू नये, यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. म्हणून शर्यतीसाठी परवानगी घेणे आवश्यक आहे.