नाशिक : नाशिकच्या जेलरोड परिसरात एका तरुणाच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. सागर अशोक आहिरे असं 32 वर्षीय तरुणाचे नाव आहे. सागरचा मृतदेह एकलहरे रोडवरील गवळी बाबा मंदिर परिसरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अवघ्या चार दिवसांनी सागरचा विवाह होता. सागर बोहल्यावर चढणार होता. घरात लग्नाची तयारी अंतिम टप्प्यात आली होती. त्यातच सोमवारी सागर बेपत्ता झाला होता. दुसऱ्या दिवशी मंगळवारी त्याचा मृतदेह आढळून आल्याने सागरच्या कुटुंबाला आणि नातलगांना मोठा धक्का बसला होता. चार दिवसांनी सागरचा विवाह होणार होता, सागरचा त्यात मृतदेह आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून सागरची हत्या कुणी केली ? सागरच्या मृत्यूचं कारण काय ? असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. सागर अहिरे याच्या मृत्यूनंतर मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला होता. त्यानंतर शवविच्छेदनाच्या माध्यमातून नाशिक पोलीस तपास करत आहे.
नाशिकच्या जेलरोड परिसरात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून अंगाला हळद लावण्याआधीच तरुणाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
सागर अहिरे असं तरुणाचे नाव असून त्याचे काही दिवसांपूर्वीच लग्न ठरले होते, 13 तारखेला त्याचा विवाह होणार होता.
अवघ्या चार दिवसांनी तरुण बोहल्यावर चढणार होता, मात्र तत्पूर्वी तो बेपत्ता होणे आणि त्यानंतर त्याचा मृतदेहच हाती लागणे या घटणेने कुटुंबियांना धक्काच बसला होता.
सागरचे लग्न असल्याने घरात आनंदाचे वातावरण होते, लग्नाची तयारी अंतिम टप्प्यात आली होती, नातेवाईकही जमले होते.
सोमवारी रात्री सागरकडे त्याचा एक मित्र आला होता, त्याच्यासोबत सागर बाहेर गेला मात्र तो बराच वेळ झाला परतलाच नाही यामुळे अहिरे कुटुंब आणि नातेवाईक मोठ्या चिंतेत होते.
सागरच्या मृत्यू मागे घातपाताचा संशय कुटुंबियांना आणि सागरच्या मित्रपरिवाराला आहे. सागरच्या मृत्युचे कारण शोधने पोलिसांसमोर आव्हान असणार आहे.
नाशिकच्या नाशिकरोड पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्यासह पोलीस पथक तपास करीत आहे.