गोंदिया : येथे एक भयानक घटना उघडकीस आली. काही मित्रांनी दारू घेतली. त्यानंतर त्यांच्यात वाद झाला. या वादानंतर त्यांनी एकाला संपवले. घटनेच्या ठिकाणी युवकाचा मृतदेह झाडाला लटकवलेल्या परिस्थितीत दिसला. घटनास्थळाची पाहणी केली असता रक्ताचे डाग जमिनीवर पडलेले दिसले. शिवाय दारुच्या बाटल्या पडलेल्या होत्या. झाडावर युवकाचा मृतदेह लटकवलेला दिसला. पोलिसांनी मृतदेह पाहिल्यानंतर त्यांना संशय आला. ही आत्महत्या नसून आत्महत्येची घटना दाखवण्याचा आरोपींना प्रयत्न केला असावा, असा पोलिसांना संशय आहे कारण…
शासकीय कृषी महाविद्यालय हिवळीजवळील वन विभागाच्या जागेत एका युवकाचा मृतदेह सापडला. हा मृतदेह झाडाला टांगलेल्या अवस्थेत होता. एका तरुणाने गळफास घेतल्याची माहिती उमेश माहुले याने पोलीस पाटील विनोद नंदेश्वर यांना दिली. नंदेश्वर यांनी घटनेची शहानिशा केली. त्यानंतर रामनगर पोलिसांना कळवले.
पोलिसांनी मृतदेह खाली उतरवला. तेव्हा त्यांना संदीपच्या मानेवर धारदार शस्त्राच्या खुणा दिसून आल्या. संदीपच्या गळ्याला गमछा, मफलदरसारख्या कपड्याने बांधून ठेवले होते. शस्त्राने वार केल्याने त्याठिकाणी रक्ताचा सडा पडला होता.
संदीपचा खून करणारे ओळखीचे असावेत, असा अंदाज वर्तवला जात आहे. दारुपार्टी झाल्यानंतर संदीपला ठार करण्यात आले असावे. कारण घटनास्थळाजळ रक्ताचा सडा पडला होता. शिवाय दहा फूट अंतरावर दारुच्या बाटल्या पडल्या होत्या. याचा अर्थ आधी दारु पिऊन नंतर त्याला खून करण्यात आला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
रामनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने पोलिसांच्या दोन चमू तयार केल्या. आरोपींचा शोध लावण्यासाठी त्यांना रवाना केले आहे. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. संदीप हा नागरा येथील चांदणीटोलीचा रहिवासी होता. संदीपने विचारही केला नसेल त्यांच्यासोबत गेल्यानंतर आपला असा शेवट होईल. पण, दारुच्या संगतीत गेल्यामुळे त्याचे त्याला परिणाम भोगावे लागले असावेत. पोलिसांच्या तपासानंतर संदीपचा खून नेमका कशासाठी केला हे स्पष्ट होईल.