ऑनलाइन गेम खेळत केली मैत्री, तरूणीला हॉटेलमध्ये भेटायला बोलावले अन्.. ‘त्या’ व्हिडीओच्या आधारे केले ब्लॅकमेल; अखेर पीडितेने …

| Updated on: Aug 08, 2023 | 3:26 PM

एका युवकाने ऑनलाइन गेमच्या माध्यमातून तरूणीशी मैत्री केली. नंतर तिला हॉटेलमध्ये भेटायला बोलावून तिचा अश्लील व्हिडीओ शूट करत त्याआधारे ब्लॅकमेल करत राहिला.

ऑनलाइन गेम खेळत केली मैत्री, तरूणीला हॉटेलमध्ये भेटायला बोलावले अन्.. त्या व्हिडीओच्या आधारे केले ब्लॅकमेल; अखेर पीडितेने ...
Follow us on

जयपूर | 8 ऑगस्ट 2023 : ऑनलाइन गेमच्या (online game) माध्यमातून तरूणाने मैत्री करून एका तरूणीला फसवून तिचे अश्लील (obscene video) व्हिडीओ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नव्हे तर त्याने तिला ब्लॅकमेल करत तिचे शोषणही केल्याचे समजते.

आरोपी तरूण हा हरियाणातील असून त्याने ऑनलाइन गेमच्या माध्यमातून जयपूरमधील एका तरूणीशी मैत्री केली अन् दोघे पार्टनर बनून PUBG खेळू लागले. खेळता-खेळता त्या युवकाने त्या भोळ्या तरूणीला जाळ्यात फसवले आणि तिच्या भेटासठी जयपूर येथे आला. तेथे पोहोतल्यावर त्याने तिला भेटीसाठी हॉटेलवर बोलावले, ती मुलगीही त्याला भेटण्यास तिथे गेली.

मात्र त्या तरूणाचा इरादा काही वेगळाच होता आणि त्याने त्या तरूणीचा फायदा घेत तिचा न्यूड व्हिडीओ बनवत तिला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. पुढील दोन वर्ष तो तिला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार करत राहिला. अखेर त्या तरूणीने कशीबशी हिंमत केली आणि पोलिसांत धाव घेत त्या तरूणाविरोधात तक्रार नोंदवली.

2019 मध्ये सुरू झालं बोलणं

जयपूरच्या बजाजनगर पोलिस स्थानकातील तक्रारीनुसार, हल्दीघाटीजवळ राहणाऱ्या 21 वर्षीय तरूणीच्या सांगण्यानुसार, ती सरकारी नोकरीसाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असून फावल्या वेळात ती ऑनलाइन गेम खेळत होती. 2019 च्या सप्टेंबर महिन्यात हरियाणातील शुभम नावाच्या तरूणाशी तिचं बोलणं झालं आणि दोघे पार्टनर बनून गेम खेळू लागले. खेलता-खेलता त्यांच्यात बऱ्याच गप्पा व्हायच्या, त्यांनी एकमेकांसोबत मोबाईल नंबरही शेअर केले होते. त्यावरूनही ते एकमेकांशी बोलायचे.

तरूणीला भेटण्यासाठी तो जयपूरला आला

त्यानंतर 2021 च्या जुलैमध्ये आरोपी शुभम हा तरूणीला भेटण्यासाठी जयपूर येथे आला. तेथे त्याने रेल्व स्टेशनजवळ एका हॉटेलमध्ये रूम बूक केली आणि गोड बोलून तरूणीला तेथेच भेटायला बोलावल. तिथे पोहोचल्यावर आरोपी आधी तिच्याशी नीट गप्पा मारत होता, मात्र थोड्य़ा वेळाने तो अश्लील बोलू लागला आणि तरूणीवर अत्याचार करून त्याचा व्हिडीओही शूट केला. नंतर लग्नाचे वचन देऊन तो दोन वर्ष सतत तिच्यावर अत्याचार करत होता. कोणालाही काही सांगितले, तर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकीही दिली. मात्र पीडित तरूणी या सर्व गोष्टींना कंटाळली होती, अखेर तिने कशीबशी हिंमत गोळा केली आणि पोलिसांकडे धाव घेत आरोपी तरूणाविरोधात तक्रार नोंदवली.