ओळख ना पाळख, एकमेकांकडे बघितल्याचं क्षुल्लक कारण, लातुरात तरुणावर हत्याराने सपासप वार

| Updated on: Jul 30, 2021 | 5:25 PM

लातूरमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एका क्षुल्लक कारणासाठी तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे.

ओळख ना पाळख, एकमेकांकडे बघितल्याचं क्षुल्लक कारण, लातुरात तरुणावर हत्याराने सपासप वार
ओळख ना पाळख, एकमेकांकडे बघितल्याचं क्षुल्लक कारण, लातुरात तरुणावर हत्याराने सपासप वार
Follow us on

लातूर : लातूरमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एका क्षुल्लक कारणासाठी तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हल्ला करणारा तरुण आणि मृतक यांची साधी ओळखही नव्हती. मृतक हा काही दिवसांपूर्वीच लातूत जिल्ह्यात आला होता. पण हल्लेखोराने रागात का बघतो? असा प्रश्न विचारत तरुणाची निघृण हत्या केली.

नेमकं काय घडलं?

संबंधित घटना ही लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात घडली आहे. जगदीश किवंडे असं 26 वर्षीय मृतक तरुणाचं नाव आहे. तो आधी हैदराबादला वास्तव्यास होता. अगदी काही दिवसांपूर्वीच तो उदगीर शहरात आला होता. जगदीश रस्त्यावर एका ठिकाणी थांबला होता. तो त्याच्या विचारात उभा होता. पण एका विकृताने भर रस्त्यावर त्याची हत्या केली. विशेष म्हणजे दोघं एकमेकांना ओळखत देखील नव्हते. तरीही भर रस्त्यात आरोपीने जगदीशवर तीक्ष्ण हत्याराने वार केले.

जगदीश याच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव सोन्या नाटकरे असं आहे. जगदीश रस्त्याच्या एका कडेला थांबला होता. त्यावेळी त्याच रस्त्यावरुन आरोपी सोन्या जात होता. यावेळी दोघांची नजरानजर झाली. पण सोन्या याने जगदीशच्या दिशेला येत माझ्याकडे रागात का बघतो? असा सवाल करत धारधार शस्त्राने वार केले. या हल्ल्यानंतर जगदीश गंभीर जखमी झाला.

जखमी जगदीशला लातूरच्या रुग्णालयात हलवलं, पण….

हल्ल्यात जगदीश गंभीर जखमी झाला. त्याला परिसरातील नागरिकांनी तातडीने जवळील रुग्णालयात दाखल केलं. पण जगदीश गंभीर जखमी झाल्याने त्याला लातूर येथील रुग्णालयात हलवण्यात आलं. पण त्याचा उपयोग होऊ शकला नाही. कारण उपचारादरम्यान जगदीशची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे उदगीर शहरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी सोन्या नाटकरे हा हल्ला करुन फरार झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. पोलीस आरोपी सोन्या नाटकरे याचा शोध घेत आहेत.

हेही वाचा :

बर्थडे पार्टीसाठी बोलावून गुंगीचे औषध, मुंबईत पंचतारांकित हॉटेलमध्ये महिलेवर बलात्कार

महापौरांच्या ‘नगरसेवक पती’कडून जीवे मारण्याची धमकी, मनपा उपायुक्तांची पोलिसात तक्रार