नवी मुंबई : दिल्लीत (Delhi) कृष्णा नगरमध्ये (krushna nagar) एका तरुणाला मारहाण करण्यात आली आहे, त्याचबरोबर तिथं फायरिंग सुध्दा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत तिथं कोणी जखमी झाल्याची माहिती मिळालेली नाही. शनिवारी सकाळी ही घटना सीसीटिव्ही फुटेजच्या माध्यमातून उजेडात आली आहे. सीसीटिव्ही (CCTV) फुटेजच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. त्याचबरोबर अशा पद्धतीच्या घटना उघडकीस आल्यामुळे अनेक आरोपींना अटक सुध्दा झाली आहे.
दिल्लीच्या कृष्णा नगरमध्ये शनिवारी सकाळी पावणे बाराच्या सुमारास मारहाण केली, त्याचबरोबर बंदुकीतून फायरिंग सुध्दा केली आहे. या सगळ्या घटनेमधील एक फुटेज बाहेर आला आहे. जिमच्या बाहेर निघालेला सोनू नावाचा व्यक्ती काही लोकांनी मारहाण केली आहे, त्याचबरोबर बंदुकीतून फायरिंग सुध्दा केली आहे. विशेष म्हणजे झालेल्या दुर्घटनेत एकही व्यक्ती जखमी झालेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनू नावाच्या एका व्यक्तीचा काही मुलांशी तिथं झगडा झाला आहे. त्यामुळे तिथल्या एका व्यक्तीने बंदुकीतून फायरिंग केली आहे. पोलिसांनी ही सुध्दा माहिती सांगितली आहे की, आरोपी आणि पीडीत व्यक्ती एकमेकांना ओळखत आहे. आरोपी व्यक्ती ही आम आदमी पार्टीचे उमेदवार मदनलालचा नातेवाईक आहे.
देशात सीसीटिव्ही फुटेजमुळे अनेक आरोपी सापडले आहेत. ज्यावेळी पोलिसांना एखादी गोष्ट किंवा चोरीचा शोध घ्यायचा असेल, त्यावेळी पोलिस पहिल्यांना सीसीटिव्ही फुटेज तपासत आढळले आहे. आतापर्यंत अनेक आरोपी सीसीटिव्ही फुटेजमुळे पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.