अलिशान बंगला, लक्झरी गाड्या, 24 लाखाची रोख रक्कम; यूट्यूबरच्या घरात सापडला कुबेराचा खजिना

| Updated on: Jul 17, 2023 | 1:49 PM

आरोपीच्या भावाने सर्व आरोपांचे खंडन केले असून खोट्या आरोपांखाली फसवण्यात येत असल्याची टीका त्याने केली आहे.

अलिशान बंगला, लक्झरी गाड्या, 24 लाखाची रोख रक्कम; यूट्यूबरच्या घरात सापडला कुबेराचा खजिना
हॉटेलमध्ये जेवायला चाललेल्या तरुणावर हल्ला
Follow us on

बरेली : उत्तर प्रदेशातील बरेली (bareli) येथे रविवारी रात्री पोलिसांनी एका यूट्यूबरच्या (youtuber) घरावर छापा मारला. या छाप्यामध्ये पोलिसांनी यूट्यूबरच्या घरातून 24 लाख रुपयांची रोकड सापडली. यानंतर पोलिसांनी तत्काळ या छाप्याची सूचना आयकर विभागाच्या (Income tax department) अधिकाऱ्यांना दिली. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून लाखो रुपयांची ही रक्कम जप्त केली आहे.

हा यूट्यूबर अवैध मार्गाने लाखो रुपये कमावत असून त्याने घरात ही रोकड ठेवली असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी मिळाली होती. याच
माहितीवरून पोलिसानी त्याच्या घरावर छापा मारला होता. तसलीम असे या यूट्यूबरचे नाव असून तो त्याच्या चॅनेलच्या माध्यमातून लोकांना शेअर मार्केटशी संबंधित माहिती द्यायचा. बरेलीतील नवाबगंज येथील मिलक गावात ही घटना घडली. अटक करण्यात आलेला आरोपी हा बीटेक पास असून त्याने अवैध मार्गाने पैसे कमावून आलिशान घर बांधल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे. तसेच त्याच्याकडे अनेक
लक्झरी गाड्याही असल्याते समजते.

2017 मध्ये बनवलं होतं यूट्यूब चॅनेल

मात्र तसलीमच्या सांगण्यानुसार तत्याने बीटेकचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर 2017 च्या ऑक्टोबर महिन्यात यूट्यूबवर एक चॅनेल तयार केले होते. त्याद्वारे तो शेअर मार्केटची माहिती देत असे. आत्तापर्यंत त्याने चॅनलद्वारे 1.20 कोटी रुपये कमावले आहेत. यासोबतच 40 लाख रुपयांचा करही भरला आहे. त्याच्या घरातून जी 24 लाखांची रक्कम मिळाली त्याबाबत त्याने सांगितले की 24 लाखांपैकी 10 लाख रुपये त्याला लग्नात मिळाले
तर 9 लाख रुपयांची रक्कम त्याने बँकेतून काढल्याचे तसलीमने स्पष्ट केले.

चॅनेलवर आहेत 99 हजारांपेक्षा अधिक सबस्क्रायबर्स

याप्रकरणी आयकर विभागाचे अधिकारी सध्या अधिक तपास करत आहेत. तसलीमच्या यूट्यूब चॅनेलवर 99 हजारांहून अधिक सबस्क्रायबर्स असल्याचे समजते. तसलीमने गावात आलिशान घर बांधले असून त्याच्याकडे अनेक लक्झरी कार्सही असल्याचे समजते.

दरम्यान तसलीमच्या भावाने सर्व आरोपांचे खंडन केले असून भावाला फसवण्यात येत असल्याचा आरोपही त्याने लावला आहे.