औरंगाबाद : जिचे (Youtuber) युट्युबवर 43 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत, ज्या काव्याच्या व्हिडिओची सोशल मिडियात सातत्याने चर्चा असते तीच औरंगाबादची काव्या ही शुक्रवारपासून गायब होती. युट्यूबर (Bindas Kavya) बिंदास काव्याचा शोध लागला असून ती मध्यप्रदेशातील इटारसी येथे पोलिसांना सापडलेली आहे. मनमाडहून ती लखनऊला जात असताना इटरसी येथे पोलिसांना आढळून आली आहे. बेपत्ता होताच काव्याच्या आईने एक व्हिडिओ सोशल मिडियावर टाकला होता. त्यानंतर अधिक चर्चेत आलेली काव्या 24 तास उलटून जाण्यापूर्वीच सापडली आहे. त्यामुळे तिच्या लाखो फॅन्सला दिलासा मिळाला आहे.
काव्या ही मूळची औरंगाबादची आहे. युट्युबवर तिचे 43 लाखहून अधिक फॉलोअर्स आहेत म्हणूनच तिची ओळख ही युट्युबर अशी बनली आहे. तर फेसबुकवरही तिचे फॅन मोठ्या प्रमाणात आहेत. सोशल मिडियाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहचलेली हीच काव्या ही रागाच्या भरात घर सोडून गेली होती. त्यामुळे तिच्या कुटुंबियांना अधिक काळजी होती. शुक्रवारी दुपारी 2 वाजता घरातून बेपत्ता झालेली काव्या ही शनिवारी दुपारपर्यंतच पोलिसांना सापडली आहे.
घरातून रागाच्या भरात निघून गेलेली काव्या ही मनमाडहून थेट लखनऊकडे निघाली होती. दरम्यान, मध्य प्रदेशातील इटारसी येथे आली असता ती पोलिसांना सापडली आहे. काल औरंगाबादहून मनमाड आणि तेथून थेट लखनऊकडे जाण्याचा तिचा मानस होता. मात्र, ही मुलगी बेपत्ता असल्याची माहिती इटारसी येथील पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन ती सापडली आहे.
ज्या सोशल मिडियामुळे काव्याची जगभर ओळख झाली त्याच मिडियाचा वापर तिला शोधण्यासाठी करण्यात आला आहे. ती बेपत्ता होताच तिच्या आई-वडिलांनी 19.22 मिनिटांचा व्हिडिओ शेअर केला आहे. शिवाय हा व्हिडिओ तिच्या व्हेरिफाइड यूट्यूब अकाउंटवर हा व्हिडिओ अपलोड केला होता.
बिंदास काव्या या युट्युबचे 43 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर त्याच तुलनेत फेसबुक पेजवरही तिला फॉलो केले जाते. गेल्या 5 वर्षापासून ती युट्युबवर सक्रिय आहे. एवढेच नाहीतर आई-वडिलांच्या मदतीनेच ती हे युट्युब चॅनल हताळते हे विशेष.