CBSE 12th board Exams 2021 नवी दिल्ली:केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक (Ramesh Pokhariyal Nishank) यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षणमंत्र्यांची, शिक्षण सचिवांची आणि राज्य परीक्षा बोर्डांच्या अध्यक्षांची बैठक होत आहे. आज होणाऱ्या सर्व राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीचं अध्यक्षस्थान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) हे भूषवणार आहेत. याशिवाय केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल.या बैठकीमध्ये बारावीच्या परीक्षा आयोजित करण्याबाबत आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. (12th Board Exam 202 dates High Level meeting chair will by Rajnath Singh Education Ministers of states)
रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करून या बैठकीत विषयी माहिती दिली आहे. या बैठकीचे अध्यक्षपद संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे असेल. या बैठकीला महिला आणि बालकल्याण विकास मंत्री स्मृती इराणी आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर हेदेखील उपस्थित राहतील, अशी माहिती पोखरियाल यांनी दिली.
The Hon’ble Prime Minister has desired that any decision affecting the careers of his beloved students has to be taken in wide consultations with all State Governments & Stakeholders. I recently held a meeting with the State Education Secretaries in this regards. (1/4)
— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) May 22, 2021
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार बारावीच्या लांबलेल्या परीक्षा आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा आयोजित करणे संबंधी उच्चस्तरीय बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रामध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सीबीएसईनं विद्यार्थी आणि शिक्षकांची सुरक्षा लक्षात घेऊन परीक्षा आयोजित करण्याबाबत पर्यायांवर विचार करावा, अशा सूचना दिल्या होत्या. बारावीच्या परीक्षा आयोजित करण्याविषयचीच्या पर्यायांवर आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यत आहे.
उच्च शिक्षण विभाग आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या तारखा निश्चित करण्याबाबत बैठकीत चर्चा होऊ शकते. कोरोना विषाणू संसर्गामुळे देशातील शिक्षण क्षेत्र मोठ्या प्रमाणावर प्रभावित झालं आहे. खास करून बारावी बोर्डाच्या परीक्षा आणि प्रवेश परीक्षा यांच्यावर त्याचा परिणाम झाला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सीबीएसईची बारावीची परीक्षा 14 एप्रिल रोजी लांबणीवर टाकली. तर, दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेलता. नियोजित वेळापत्रकाप्रमाणं सीबीएसईच्या बारावी परीक्षेचे आयोजन 4 मे ते 14 जून दरम्यान होणार होतं.
संबधित बातम्या:
पदवीचा 40 टक्के अभ्यासक्रम ऑनलाईन शिकवावा लागणार, यूजीसीनं सूचना मागवल्या
(12th Board Exam 202 dates High Level meeting chair will by Rajnath Singh Education Ministers of states)