मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाचा निकाल आज जाहीर झाला आहे. (HSC Result Declared) यंदा राज्यात बारावीचा निकाल 99.63 टक्के लागला आहे. विशेष म्हणजे यंदा राज्यातल्या 46 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजेच 100 टक्के गुण मिळाले आहेत. (46 Students have got 100 percent marks in HSC Result in Maharashtra)
यावर्षी कोरोनास्थितीमुळे 12 वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे बारावीचा निकाल (HSC Result) हा अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने बनवण्यात आला आहे. त्यामुळे आपला निकाल काय लागेल याची सर्व विद्यार्थ्यांना उत्सुकता लागली होती. आता 12 वीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये विज्ञान शाखेचा निकाल 99.45 टक्के, कला शाखेचा निकाल 99.83 टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल 99.81 टक्के लागला आहे. एमसीव्हीसीमध्ये 98.8 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील गुणांना सर्वाधिक वेटेज
बारावी निकालासंदर्भात जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाला सर्वाधिक वेटेज दिलं गेलं. इ.10 वी मधील मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण, इ.11 वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण व इ.12 वीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय मिळालेले गुण तसेच इ.12 वी चे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण या नुसार हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दुपारी 4 वाजता विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पद्धतीनं पाहाता येईल.
निकाल पाहण्यासाठी बोर्डाने एकूण चार नव्या वेबसाईट जारी केल्या आहेत. विद्यार्थ्यांना या अधिकृत वेसबाईट्सवर त्यांचा निकाल पाहता येणार आहे.
निकाल कुठे पाहायचा?
1. https://hscresult.11 thadmission.org.in
www.mahresult.nic.in आणि https://msbshse.co.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.
तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
काही दिवसांपूर्वी राज्यातल्या दहावी बोर्डाचा निकाल लागला होता. या निकालातही दहावीच्या तब्बल 957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले होते. तर 12 हजार 384 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला होता. कोरोनामुळे परीक्षा रद्द झाल्यानंतर अंतर्गत मूल्यमापन पद्धतीनुसार दहावी- बारावीचे निकाल जाहीर करण्यात आले. या पद्धतीचा विद्यार्थ्यांना गुणांमध्ये फायदा झाल्याचं दिसत आहे. (46 Students have got 100 percent marks in HSC Result in Maharashtra)
संबंधित बातम्या :