NIOS Admission 2021 : माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गातील प्रवेशासाठी अर्जासाठी 1 एप्रिलपासून प्रक्रिया सुरू

| Updated on: Mar 30, 2021 | 5:07 PM

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (एनआयओएस) द्वारा माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गांच्या प्रवेशासाठी अधिसूचना जारी केली आहे. या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा एप्रिल 2022 मध्ये घेण्यात येणार आहे. (Admission process for secondary and higher secondary classes starts from 1st April)

NIOS Admission 2021 : माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गातील प्रवेशासाठी अर्जासाठी 1 एप्रिलपासून प्रक्रिया सुरू
माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गातील प्रवेशासाठी अर्जासाठी 1 एप्रिलपासून प्रक्रिया सुरू
Follow us on

नवी दिल्ली : कोणत्याही वर्गातील उमेदवार ज्यांचा अभ्यास चुकला असेल किंवा नियमित वर्गांची बंधन न घेता दहावी व बारावी उत्तीर्ण होऊ इच्छित असेल त्यांनी आपले शिक्षण खुल्या माध्यमातून पूर्ण करू शकतात. नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (एनआयओएस) द्वारा माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गांच्या प्रवेशासाठी अधिसूचना जारी केली आहे. यासाठी 28 मार्च 2021 रोजी संस्थेने जाहीर केलेल्या अद्ययावत माहितीनुसार माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 1 एप्रिलपासून सुरू होणार आहे. या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा एप्रिल 2022 मध्ये घेण्यात येणार आहे. (Admission process for secondary and higher secondary classes starts from 1st April)

असा करा अर्ज

इच्छुक उमेदवार एनआयओएस विद्यार्थी पोर्टल, sdmis.nios.ac.in वर उपलब्ध केलेल्या ऑनलाईन अर्ज फॉर्मद्वारे नोकरीसाठी अर्ज करू शकतात. दोन्ही वर्गाचे वेगवेगळे विषय, अभ्यासक्रम फी, विविध राज्यामधील अभ्यास केंद्रे आणि पत्त्याची माहिती विद्यार्थी पोर्टलवर पाहता येईल.

एनआयओएसने जारी केली हेल्पलाईन

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आणि विविध प्रश्नांची दखल घेण्यासाठी एनआयओएसने हेल्पलाईन जारी केली आहे. माध्यमिक व वरिष्ठ माध्यमिक वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना प्रवेश प्रक्रिया, फी किंवा कोर्स इ. विषयी जाणून घ्यायचे असेल तर ते टोल फ्री क्रमांक 1800-180-9393 वर 24X7 कॉल करू शकतात. तसेच, तुम्हाला Isc@nios.ac.in वर ईमेल करून मदत मिळू शकेल.

या अभ्यासक्रमांमध्ये घेऊ शकतो प्रवेश

एनआयओएसने जाहीर केलेल्या 2021-22 च्या अद्ययावत माहितीनुसार माध्यमिक स्तरावरील 18 भाषांसह एकूण 36 विषयांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाईल. तसेच 12 भाषांसह एकूण 41 विषयांसाठी उच्च माध्यमिक स्तरावर प्रवेश देण्यात येणार आहे. दुसरीकडे, एनआयओएसमार्फत कृषी, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, आरोग्य आणि पॅरा-मेडिसिन, गृह विज्ञान आणि आतिथ्य, संगणक आणि आयटी, व्यवसाय आणि वाणिज्य आणि शैक्षणिक प्रशिक्षण या विषयांशी संबंधित 103 अभ्यासक्रम एनआयओएस चालवित आहेत. (Admission process for secondary and higher secondary classes starts from 1st April)

इतर बातम्या

कोव्हिड वॉर्डच्या बाथरुममध्ये सलाईनच्या पाईपने गळफास, दोन बाधितांच्या आत्महत्यांनी शहर हादरलं

HDFC Bank च्या ग्राहकांची समस्या वाढली, नेटबँकिंग आणि मोबाईल बँकिंग वापरण्यास अडचणी